Lokmat Money >गुंतवणूक > लोक पैसे कुठे गुंतवत आहेत?; शेअर बाजारात तेजी असूनही गुंतवणूक ५ टक्क्यांपेक्षाही कमी

लोक पैसे कुठे गुंतवत आहेत?; शेअर बाजारात तेजी असूनही गुंतवणूक ५ टक्क्यांपेक्षाही कमी

भारतीय लोक आपल्या बचतीचा बहुतांश म्हणजेच ५० टक्क्यांपेक्षाही अधिक हिस्सा वास्तव संपदेत (घर, जमीन) गुंतवितात.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2023 08:41 AM2023-07-06T08:41:51+5:302023-07-06T08:42:08+5:30

भारतीय लोक आपल्या बचतीचा बहुतांश म्हणजेच ५० टक्क्यांपेक्षाही अधिक हिस्सा वास्तव संपदेत (घर, जमीन) गुंतवितात.

Where are people investing money?; Investment is less than 5 percent despite boom in stock market | लोक पैसे कुठे गुंतवत आहेत?; शेअर बाजारात तेजी असूनही गुंतवणूक ५ टक्क्यांपेक्षाही कमी

लोक पैसे कुठे गुंतवत आहेत?; शेअर बाजारात तेजी असूनही गुंतवणूक ५ टक्क्यांपेक्षाही कमी

मुंबई : भारतीय शेअर बाजार सातत्याने नवनवे उच्चांक करीत असतानाही भारतीय परिवारांची गुंतवणूक ५ टक्क्यांपेक्षाही कमी आहे. जागतिक ब्रोकरेज संस्था जेफरीजच्या आकडेवारीनुसार, मार्च २०२३ पर्यंत भारतीय परिवारांची एकूण संपत्ती ११.१ लाख कोटी डॉलरपेक्षा (१,००० लाख कोटी रुपये) अधिक होती. तथापि, त्यातील ५ टक्क्यांपेक्षाही कमी गुंतवणूक शेअर बाजारात होती. भारतीय लोक आपल्या बचतीचा बहुतांश म्हणजेच ५० टक्क्यांपेक्षाही अधिक हिस्सा वास्तव संपदेत (घर, जमीन) गुंतवितात.

बँक एफडीला अधिक पसंती
भारतीय परिवारांकडून बचतीसाठी बँक एफडीला सर्वाधिक पसंती दिली जाते आणि सोने खरेदी केली जाते. इक्विटीमधील गुंतवणूक ४.७% आहे. इक्विटीमधील गुंतवणूक वाढताना दिसत आहे. तरीही बँक एफडीच्या तुलनेत ती अजूनही खूपच कमी आहे.

  • १,००० लाख कोटी रुपये म्हणजेच ११.१ लाख कोटी डॉलर मार्च २०२३ पर्यंत भारतीयांची एकूण संपत्ती राहिली आहे.
  • १९% वाढली एसआयपी खाती, एसआयपी गुंतवणुकीत वार्षिक २० टक्के वाढ.
  • २.४५ लाख कोटी ते २.९० लाख कोटी रुपयांची दरवर्षी होते शेअर बाजारात गुंतवणूक 
  • ३०० लाख कोटी रुपयांच्या नव्या विक्रमी उच्चांकावर मुंबई शेअर बाजारातील सूचीबद्ध कंपन्यांचे भांडवल पोहोचले 

एसआयपीद्वारे गुंतवणूक
भारतीय कुटुंबे एसआयपीच्या माध्यमातून म्युच्युअल फंडात गुंतवणूक करत आहेत. मार्च २०२३ मध्ये एसआयपी खात्यांच्या संख्येत १९ टक्के वाढ झाली. सध्या एसआयपीमध्ये दरमहा १४ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होते. पुढील ५ वर्षांत हा आकडा दरमहा ३० हजार कोटी रुपये होईल.

Web Title: Where are people investing money?; Investment is less than 5 percent despite boom in stock market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.