Zerodha Nikhil Kamath : सध्या गुंतवणूकीसाठी अनेक जण शेअर बाजाराकडे वळत आहेत. परंतु गुंतवणूक कुठे करावी असा प्रश्न अनेकांना असतो. दरम्यान, स्टॉक ब्रोकर आणि फायनान्शिअल सर्व्हिसेस कंपनी झिरोदाचे (Zerodha) को-फाऊंडर निखिल कामथ (Nikhil Kamath) यांनी एका क्षेत्राचा उल्लेख केला आहे. एनर्जी ट्रान्झिशन सेक्टरमध्ये तेजी आणि नफ्याच्या चांगल्या संधी दिसत असल्याचं कामथ म्हणाले. यासाठी आपण त्यात गुंतवणूक करू इच्छितो असंही त्यांनी सांगितलं. याचा उल्लेख त्यांनी आपलं पॉडकास्ट 'WTF is 'Making It' in an Offbeat Career?' मध्ये केला. या पॉडकास्टमध्ये रॅपर बादशाह, अभिनेत्री क्रिती सनॉन आणि क्रिकेटर केएल राहुल सहभागी झाले होते.
पॉडकास्टमध्ये दीर्घकालीन यशासाठी योग्य क्षेत्र निवडण्याचं महत्त्व देखील अधोरेखित करण्यात आलं. आपल्याकडे तीन कोटी रुपये असतील तर गॅरंटीड नफ्यासाठी कुठे गुंतवणूक करावी, असा प्रश्न बादशहानं कामथ यांना विचारला. यावर उत्तर देताना कामथ यांनी फॉसिल फ्युअलमधून रिन्यूएबल एनर्जी सोर्सेजकडे ग्लोबल शिफ्टला एक मोठं आणि महत्त्वाची संधी असल्याचं म्हटलं. एनर्जी ट्रान्झिशन ही जगातील एक मोठी गोष्ट आहे, आपल्या इतिहासातील बहुतांश युद्ध यावरच लढली गेली असल्याचंही कामथ म्हणाले.
आकर्षक नसलं तरी नफ्याची क्षमता
जरी अन्य क्षेत्रांप्रमाणे एनर्जी क्षेत्र आकर्षक नसलं तरी यात नफा मिळवून देण्याची अधिक क्षमता आहे. विशेषत: सरकारी मदतीसह, जे रिन्यूएबल एनर्जीमध्ये ट्रान्झिशनला चालना देत आहेत, असं ते म्हणाले. कामथ यांनी इलेक्ट्रिक व्हेईकल, बॅटरी उत्पादन आणि सोलर एनर्जी सारखी क्षेत्र आश्वासक असल्याचं म्हटलं.