Join us  

वर्षभरात चांगला नफा कोण देतो?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2023 5:41 AM

अचानक पैशांची गरज निर्माण झाल्यास एफडी अथवा पॉलिसी मुदतीपूर्वीच तोडाव्या लागतात. त्यामुळे मोठे नुकसान होते.

लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : मुदत ठेवी (एफडी) अथवा पॉलिसी यांसारख्या दीर्घकालीन गुंतवणुकीतून परतावा चांगला मिळतो. मात्र, अचानक पैशांची गरज निर्माण झाल्यास एफडी अथवा पॉलिसी मुदतीपूर्वीच तोडाव्या लागतात. त्यामुळे मोठे नुकसान होते. अशा स्थितीत चांगला परतावा देणारे एक वर्षाच्या कालावधीचे गुंतवणूक पर्याय योग्य ठरतात. अशा चार पर्यायांबाबत आज जाणून घेऊ या.

 nबँफ एफडी   कोणत्याही बँकेत ७ दिवसांपासून १० वर्षांपर्यंत मुदत ठेवींत (एफडी) गुंतवणूक करता येते. पोस्टातही १ वर्षापासून ५ वर्षांपर्यंत एफडीमध्ये गुंतवणूक करता येते. यावर कालावधीनुसार, वेगवेगळा व्याजदर असतो. गुंतवणुकीपूर्वी व्याजदर अवश्य जाणून घ्या. अधिक व्याज देणाऱ्या बँकेत गुंतवणूक करा.

 nकॉर्पोरेट एफडी   अनेक कंपन्या आपल्या व्यवसायासाठी कॉर्पोरेट एफडीच्या माध्यमातून बाजारातून पैसे उभे करतात. कॉर्पोरेट एफडीचा व्याजदर बँकांच्या एफडीपेक्षा अधिक असतो. मात्र, यात जोखीमही असते. अधिक रेटिंग असलेल्या कंपन्यांच्या एफडीमध्ये कमी जोखीम असते. यात १ ते ५ वर्षांसाठी गुंतवणूक करता येते. 

 nआवर्ती ठेवी   यांनाच सामान्यांच्या भाषेत ‘आरडी’ म्हणतात. यात दर महिन्याला ठरावीक रक्कम गुंतविता येते. परिपक्वतेच्या वेळी ही रक्कम व्याजासह परत मिळते. आरडीमध्ये तुम्ही किमान एक वर्षाच्या कालावधीसाठी गुंतवणूक करू शकता. तुमच्या गरजेनुसार कालावधी ठरविता येतो. पोस्टातील आरडीचा कालावधी पाच वर्षांचा असतो.

 nडेट म्युच्युअल फंड   एक वर्षासाठी गुंतवणूक करायची असल्यास डेट म्युच्युअल फंडाचा पर्याय चांगला आहे. डेट फंडातील तुमची गुंतवणूक म्युच्युअल फंड कंपन्या सुरक्षित ठिकाणी गुंतवतात. कंपन्यांकडे गुंतवणूकविषयक तज्ज्ञ असतात. त्यामुळे यात परतावाही चांगला मिळतो. डेट फंडांना निश्चित परिपक्व तारीख असते

टॅग्स :पैसा