करबचत करणाऱ्या गुंतवणुकीसाठी अनेक पर्याय भांडवली बाजारात उपलब्ध आहेत. लोक साधारणत: एफडी आणि राष्ट्रीय बचत पत्रे (एनएससी) यांवर विश्वास ठेवतात. मात्र, इक्विटी लिंक्ड सेव्हिंग स्कीम (ईएलएसएस) हाही एक चांगला पर्याय आहे. ईएलएसएस हा करबचत आणि अधिक परतावा यासाठी अधिक चांगला पर्याय मानला जातो. तिन्ही योजनांत आयकर कायदा कलम ८०सी अन्वये वार्षिक १.५ लाख रुपयांपर्यंत कर सवलत मिळते.
एकरकमी गुंतवणुकीवर मिळेल एवढा परतावा
गुंतवणुकीची एकूण रक्कम ₹३ लाख
गुंतवणूक मुदत ५ वर्षे
एनएससी ₹४,१६,८४८
एफडी ₹४,११,०२६
ईएलएसएस ₹५,७७,६२४
दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी एसआयपी सर्वोत्तम
मंथली एसआयपी ₹१,०००
गुंतवणूक अवधी २५ वर्षे
एकूण गुंतवणूक ₹३ लाख
ईएलएसएसमध्ये १४% दराने मिळणारा सरासरी परतावा ₹२४.२७ लाख
एकूण निधी ₹२७.२७ लाख
कोणत्या योजनेत किती परतावा?
एफडी ५.५ ते ६.६%
एनएससी ६.८%
एनपीएस १२%
ईएलएसएस १४%
(५ वर्षांचा सरासरी परतावा)
दीर्घ अवधी हाच गुंतवणुकीचा मूलमंत्र
एकरकमी गुंतवणुकीवर एफडी आणि एनएससी यामध्ये सरासरी समान परतावा मिळतो. एसआयपीच्या माध्यमातून २५ वर्षे दरमहा १,००० रुपयांची गुंतवणूक केल्यास गुंतवणूक केलेली रक्कम अवघी तीन लाख रुपये राहील. मात्र, त्यावरील परतावा तब्बल २४ लाख रुपयांपेक्षाही अधिक असेल.
पाच वर्षांत सर्वाधिक परतावा देणाऱ्या ईएलएसएस योजना
एसबीआय टॅक्स ॲडव्हांटेज फंड २४.७०%
क्वांट टॅक्स प्लॅन २३.८५%
कॅनरा रेबेको इक्विटो टॅक्स सेव्हर फंड १७.२६%
मिरे ॲसेट टॅक्स सेव्हर फंड १६.४२%
बँक ऑफ इंडिया टॅक्स ॲडव्हांटेज फंड १६.४२%