Join us

पैशांची बचत करण्यात बायको नवऱ्यापेक्षा एक पाऊल पुढे! 'या' सवयींमुळे त्यांची पर्स कधीच नसते रिकामी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2025 15:21 IST

Women's Saving Habits : पुरुषांच्या तुलनेत महिला अधिक पैशांची बचत करतात हे संशोधनातून समोर आलं आहे. यापाठीमागे त्यांच्या काही सवयी कारणीभूत असतात.

Women's Saving Habits : सामान्यपणे महिला नवऱ्याचे पैसे उडवत असल्याचे सांगितले जाते. सोशल मीडियातही अनेकदा अशा प्रकारचा कंटेन्ट पाहायला मिळतो. मात्र, प्रत्यक्षात परिस्थिती फार वेगळी आहे. पत्नी पतीच्या तुलनेत बचत करण्यात अग्रेसर असल्याचे एक अहवालातून स्पष्ट झालं आहे. जर तुमच्याही हातात पगाराचे पैसे उरत नसतील. तर ते पत्नीकडे देऊन पाहा. कारण, महिलांच्या अशा काही सवयी आहेत, ज्याने त्यांची पर्स कायम भरलेली असते.

आर्थिक शिस्त : पैशांची बचत करण्यासाठी नियम आणि मर्यादा निश्चित कराव्या लागतात. पुरुषांपेक्षा स्त्रिया अधिक शिस्तप्रिय असल्याने त्यांना नियमांचे पालन करणे आणि अधिक पैसे वाचवणे सोपे जाते.

कमी जोखीम : आर्थिक बचतीशी संबंधित बाबींमध्ये पुरुषांपेक्षा स्त्रिया सामान्यतः कमी जोखमी घेतात. त्यामुळे शेअर मार्केट, लॉटरी किंवा इतर जोखमीच्या योजनांऐवजी बचत खाते यासारखे सुरक्षित गुंतवणूक पर्याय निवडतात.

पैशांचा योग्य वापर : प्रत्येक घरात महिला आपल्या कुटुंबाचा पैसा सांभाळण्याची जबाबदारी घेतात. कालांतराने, ते घरातील प्रत्येकाची आणि प्रत्येक गोष्टीची काळजी घेऊ लागतात. ज्यामुळे त्यांना बचत करण्याची सवय लागते.

दूरदृष्टी : स्त्रिया आर्थिक नियोजन आणि दीर्घकालीन दृष्टी असलेल्या बजेटला प्राधान्य देतात, ज्यामुळे बचतीच्या चांगल्या सवयी विकसित होतात. जेव्हा ते काही दीर्घकालीन आर्थिक उद्दिष्टे ठेवतात तेव्हा पैसे वाचवणे आणि आर्थिक लाभ मिळवणे सोपे होते. 

टॅग्स :गुंतवणूकमहिलापैसा