पुढच्या वर्षीच्या बजेटपूर्वी सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) खात्यावर अधिक व्याज मिळेल का? असा प्रश्न अनेकांच्या मनात असेल. PPF चा व्याज दर एप्रिल 2020 पासून 7.1 टक्क्यांवर कायम आहे. दरम्यान, ज्येष्ठ नागरिक बचत योजना (SCSS), नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट (NSC), आणि सुकन्या समृद्धी योजना (SSY) यासह इतर अनेक छोट्या बचत योजनांच्या व्याजदरात वाढ झाली आहे. मात्र पीपीएफचे व्याजदर मात्र वाढलेले नाहीत. जानेवारी-मार्च 2024 चे व्याजदर आता सरकार ठरवेल. आता सरकार अर्थसंकल्पापूर्वी सर्वसामान्यांना व्याजदर वाढीचं गिफ्ट देणार की नाही हे पाहावं लागणारे.
कसं ठरवलं जातं व्याजछोट्या बचत योजनांमधील व्याजदर मागील तिमाहीतील सरकारी रोख्यांवर मिळणाऱ्या उत्पन्नावर अवलंबून असतात. 10 वर्षांचे सरकारी रोखे 7 टक्के ते 7.2 टक्के उत्पन्न देत आहेत. तो 7.1 टक्के ते 7.2 टक्के दरम्यान असण्याची अपेक्षा आहे. महागाईचा दरही 5 ते 6 टक्क्यांच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत अल्पबचत योजनेत बदल अपेक्षित आहेत. सरकारने अलीकडेच 5 वर्षांच्या पोस्ट ऑफिस आरडी (Recurring Deposit) वर व्याजदरात वाढ केली आहे.
कोणत्या योजनेवर किती व्याज?
- एका वर्षाची पोस्ट ऑफिस एफडी (Post Office FD) : 6.9 टक्के
- दोन वर्षांची पोस्ट ऑफिस एफडी: 7 टक्के
- तीन वर्षांची पोस्ट ऑफिस एफडी: 7 टक्के
- 5 वर्षांची पोस्ट ऑफिस एफडी: 7.5 टक्के
- 5 वर्षांची आरडी (Post Office RD): 6.7 टक्के (पूर्वी व्याज 6.5 टक्के होते)
- राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (NSC): 7.7 टक्के
- किसान विकास पत्र (KVP): 7.5 टक्के (115 महिन्यांत मॅच्युरिटी)
- पीपीएफ - 7.1 टक्के
- सुकन्या समृद्धी खाते (Sukanya Samridhi Yojna): 8.0 टक्के
- ज्येष्ठ नागरिक बचत योजना (enior Citizen Saving Scheme) : ८.२ टक्के
- मंथली इन्कम स्कीम (Post Office Monthly Scheme): 7.4 टक्के