Lokmat Money >गुंतवणूक > पावसाच्या प्रतीक्षेत तुमची गुंतवणूक आटणार का?

पावसाच्या प्रतीक्षेत तुमची गुंतवणूक आटणार का?

कंपन्यांचे जाहीर होणारे तिमाही निकाल, मान्सूनची प्रगती आणि परकीय वित्तसंस्थांची कामगिरी याकडेही बाजाराचे लक्ष असेल.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2023 06:44 AM2023-07-17T06:44:24+5:302023-07-17T06:44:43+5:30

कंपन्यांचे जाहीर होणारे तिमाही निकाल, मान्सूनची प्रगती आणि परकीय वित्तसंस्थांची कामगिरी याकडेही बाजाराचे लक्ष असेल.

Will your investment dry up while waiting for the rains? | पावसाच्या प्रतीक्षेत तुमची गुंतवणूक आटणार का?

पावसाच्या प्रतीक्षेत तुमची गुंतवणूक आटणार का?

प्रसाद गो. जोशी 
शेअर बाजाराच्या प्रमुख निर्देशांकांनी गाठलेल्या उच्चांकांमुळे शेअर बाजारात उत्साहाचे वातावरण असले तरी या सप्ताहामध्ये नफा कमविण्यासाठी काही प्रमाणात विक्री होऊन बाजार खाली येण्याची शक्यता आहे. मात्र, एकंदरीत बाजाराचे वारे तेजीतच वाहण्याची शक्यता आहे. कंपन्यांचे जाहीर होणारे तिमाही निकाल, मान्सूनची प्रगती आणि परकीय वित्तसंस्थांची कामगिरी याकडेही बाजाराचे लक्ष असेल.

गत सप्ताहामध्ये सेन्सेक्स आणि निफ्टीने गाठलेले नवीन उच्चांक आणि सप्ताहाच्या अखेरीस नवीन उच्चांकांवर हे निर्देशांक बंद होणे हे गुंतवणूकदारांच्या पाठिंब्याचे द्योतक  मानले जात आहे.  देशात महागाईच्या दरात वाढ झाली आहे. त्याचा काहीसा परिणाम शेअर बाजारावर होणार आहे. 

परकीय वित्तसंस्थांनी ३० हजार कोटी ओतले 
परकीय वित्तसंस्थांकडून जोरदार खरेदी होत आहे. जुलै महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात या संस्थांनी भारतीय बाजारामध्ये तब्बल ३०,६०० कोटी रुपये ओतले आहेत. या संस्थांनी या वर्षामध्ये आतापर्यंत १.०७ लाख कोटी रूपये गुंतविले आहेत. 

Web Title: Will your investment dry up while waiting for the rains?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.