Lokmat Money >गुंतवणूक > विप्रो, TCS, इन्फोसिस...; देशातील दिग्गज आयटी कंपन्यांनी AI वर सुरू केले काम

विप्रो, TCS, इन्फोसिस...; देशातील दिग्गज आयटी कंपन्यांनी AI वर सुरू केले काम

AI मुळे नोकऱ्या जाणार, अशी चर्चा सुरू असताना देशातील आयटी कंपन्यांनी या तंत्रज्ञानावर काम सुरू केले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2023 06:55 PM2023-07-18T18:55:42+5:302023-07-18T18:56:58+5:30

AI मुळे नोकऱ्या जाणार, अशी चर्चा सुरू असताना देशातील आयटी कंपन्यांनी या तंत्रज्ञानावर काम सुरू केले आहे.

Wipro, TCS, Infosys; Major IT companies of the country have started working on AI | विप्रो, TCS, इन्फोसिस...; देशातील दिग्गज आयटी कंपन्यांनी AI वर सुरू केले काम

विप्रो, TCS, इन्फोसिस...; देशातील दिग्गज आयटी कंपन्यांनी AI वर सुरू केले काम

जगभरात आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) चे धोके आणि फायदे, यावर वाद-प्रतिवाद सुरू आहेत. यातच देशातील आघाडीच्या IT कंपन्या या तंत्रज्ञानावर मोठ्या प्रमाणावर काम सुरू करण्याच्या तयारीत आहेत. अलीकडेच दिग्गज IT कंपनी Wipro Limited ने आपल्या सर्व 2.5 लाख कर्मचाऱ्यांना AI मध्ये प्रशिक्षण देण्यासाठी आणि उत्पादनांमध्ये या तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी एक अब्ज डॉलर्स खर्च करण्याची घोषणा केली होती.

Infosys 2 बिलियन डॉलर खर्च करणार

आता Infosys ने ऑर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि ऑटोमेशन डेव्हलपमेंटसाठी आपल्या ग्राहकांपैकी एकाशी करार करण्याचे जाहीर केले आहे.  कंपनीने शेअर बाजाराला सांगितले की, 5 वर्षांमध्ये एकूण खर्च $2 अब्ज इतका असेल. इन्फोसिसने या कराराबद्दल तपशील दिलेला नाही, परंतु असे मानले जात आहे की, 20 जुलै रोजी तिमाही निकालांच्या घोषणेसह ते या बाबत सविस्तर माहिती देतील.

यापूर्वी मे महिन्याच्या सुरुवातीला इन्फोसिसने Topaz लॉन्च केले होते. ही कंपनीचे नवीन तंत्रज्ञान आहे, जे डेटा अॅनालिटिक्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि जनरेटिव्ह AI ला एकत्र करते.

TCS देखील अॅक्टिव्ह

आयटी क्षेत्रातील आणखी एक दिग्गज कंपनी टाटा कंसल्टन्सी सर्व्हिसेज एक नवीन तंत्रज्ञान जनरेटिव्ह आर्टिफिशियल इंटेलिजन्स (जेन-AI) वर काम करत आहे. कंपनीला ग्राहकांकडून 100 पेक्षा अधिक ऑफर मिळाल्या आहेत. टीसीएस आपल्या 65,000 डोमेन तंज्ञांची मदत घेईल. 

Web Title: Wipro, TCS, Infosys; Major IT companies of the country have started working on AI

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.