Lokmat Money >गुंतवणूक > ₹५०० पासून करू शकता गुंतवणूक, २४ जुलैला उघडणार स्कीम; पाहा योजना, बनेल तुमचा पैसा 

₹५०० पासून करू शकता गुंतवणूक, २४ जुलैला उघडणार स्कीम; पाहा योजना, बनेल तुमचा पैसा 

बजाज फिनसर्व्ह असेट मॅनेजमेंटनं आपली पहिली इक्विटी स्कीम बजाज फिनसर्व्ह फ्लेक्सी कॅप फंड सुरू केली आहे. पाहा काय आहे खास.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2023 04:19 PM2023-07-21T16:19:02+5:302023-07-21T16:21:25+5:30

बजाज फिनसर्व्ह असेट मॅनेजमेंटनं आपली पहिली इक्विटी स्कीम बजाज फिनसर्व्ह फ्लेक्सी कॅप फंड सुरू केली आहे. पाहा काय आहे खास.

You can invest from rs 500 the scheme will open on July 24 Look at the plan your money will be made | ₹५०० पासून करू शकता गुंतवणूक, २४ जुलैला उघडणार स्कीम; पाहा योजना, बनेल तुमचा पैसा 

₹५०० पासून करू शकता गुंतवणूक, २४ जुलैला उघडणार स्कीम; पाहा योजना, बनेल तुमचा पैसा 

Mutual Fund NFO: बजाज फिनसर्व्ह असेट मॅनेजमेंटनं (Bajaj Finserv Asset Management) आपली पहिली इक्विटी स्कीम बजाज फिनसर्व्ह फ्लेक्सी कॅप फंड (Bajaj Finserv Flexi Cap Fund) सुरू केली आहे. ही एक ओपन-एंडेड इक्विटी स्कीम आहे. याचा उद्देश मेगाट्रेडर्स (Megatrends) या स्ट्रॅटजीवर आधारित संपूर्ण मार्केट कॅपमध्ये इक्विटी आणि इक्विटी संबंधित पर्यायांमध्ये गुंतवणूक करून दीर्घकालीन वेल्थ निर्माण करणं हा आहे. हा एनएफओ 24 जुलै 2023 रोजी सबस्क्रिप्शनसाठी उघडेल आणि 7 ऑगस्ट 2023 रोजी बंद होईल. या योजनेत लार्ज कॅप, मिड कॅप, स्मॉल कॅप स्टॉक्समध्ये निधी गुंतवला जाईल.

या नवीन फंड ऑफरमध्ये किमान 500 रुपयांची गुंतवणूक केली जाऊ शकते, त्यानंतर कोणतीही रक्कम एक रुपयाच्या पटीत गुंतविली जाऊ शकते. बजाज फिनसर्व्ह फ्लेक्सी कॅप फंड ईनक्यूबे (InQuBe) या संकल्पनेवर आधारित गुंतवणूकीची रचना साकारणार आहे.

"बजाज फिनसर्व्ह फ्लेक्सी कॅप फंड मेगाट्रेण्डवर आधारित आहे. मेगाट्रेण्ड दीर्घकालीन बदल असून अर्थव्यवस्था, व्यवसाय आणि कंपन्यांना प्रभावित करतात. मेगाट्रेण्डच्या माध्यमातून दीर्घकालीन बाय अॅण्ड होल्ड गुंतवणूकीच्या संधी तयार केल्या जातात. बिझनेस सायकल, कॉन्सेप्ट बेस्ड आणि फॅक्टर बेस्ड गुंतवणूकीत हाच मुख्य फरक आहे.  आमचा पोर्टफोलिओ लाँग टर्म, मल्टी कॉन्सेप्ट, मल्टी कॅपिटल, मल्टी सेक्टर आणि मल्टी ओरिअंटेड असेल,” अशी प्रतिक्रिया, बजाज फिनसर्व्ह असेट मॅनेजमेंटचे सीआयओ निमेश चंदन यांनी दिली.

(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आली आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: You can invest from rs 500 the scheme will open on July 24 Look at the plan your money will be made

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.