Lokmat Money >गुंतवणूक > Atal Pension योजनेमध्ये ऑनलाइन गुंतवणूक करता येणार, सरकारनं सुरू केली नवी सेवा

Atal Pension योजनेमध्ये ऑनलाइन गुंतवणूक करता येणार, सरकारनं सुरू केली नवी सेवा

सरकारनं असंघटित क्षेत्राशी निगडित लोकांमध्ये सामाजिक सुरक्षिततेला प्रोत्साहन देण्यासाठी अटल पेन्शन योजना सुरू केली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2024 03:39 PM2024-02-08T15:39:25+5:302024-02-08T15:39:49+5:30

सरकारनं असंघटित क्षेत्राशी निगडित लोकांमध्ये सामाजिक सुरक्षिततेला प्रोत्साहन देण्यासाठी अटल पेन्शन योजना सुरू केली आहे.

You can invest online in Atal Pension Yojana the government has launched a new service details | Atal Pension योजनेमध्ये ऑनलाइन गुंतवणूक करता येणार, सरकारनं सुरू केली नवी सेवा

Atal Pension योजनेमध्ये ऑनलाइन गुंतवणूक करता येणार, सरकारनं सुरू केली नवी सेवा

Atal Pension Yojna: सरकारनं असंघटित क्षेत्राशी निगडित लोकांमध्ये सामाजिक सुरक्षिततेला प्रोत्साहन देण्यासाठी अटल पेन्शन योजना (APY) सुरू केली आहे. याद्वारे असंघटित क्षेत्राशी निगडित लोकांकडे वृद्धापकाळात उत्पन्नाचे साधन चालू राहतं. पेन्शन फंड आणि नियामक आणि विकास प्राधिकरणानं (PFRDA) त्याचं मुख्य परिपत्रक जारी केले आहे. यामध्ये, ऑनलाइन सेवा सुधारणं आणि ऑनबोर्ड म्हणजेच लोकांना योजनेत सामील होणं सोपं होईल. अटल पेन्शन योजना सदस्य आणि नवीन युझर्ससाठी योजनेत सामील होणं पूर्वीपेक्षा सोपं होईल. हे परिपत्रक ३१ जानेवारी २०२४ रोजी जारी करण्यात आलं आहे.
 

PFRDA परिपत्रकानुसार, केंद्रीय किपिंग एजन्सी प्रोटीन ई-गव्हर्नन्सनं (PCRA) eAPY लाँच केलं आहे. यामध्ये सबस्क्रिप्शन प्रोसेस सुलभ करण्यात आली आहे. यामध्ये, आधार eKYC/XML/Virtual ID द्वारे डिजिटल नावनोंदणी पूर्वीपेक्षा अधिक सुलभ होणार आहे. यामुळे लोकांचा वेळ, श्रम, पैसा इत्यादींची बचत होईल. तसंच, याद्वारे लोकांना योजनेचा लाभ घेण्यासाठी बँकेच्या शाखेत जाण्याची गरज भासणार नाही.
 

कसा करायचा ऑनलाइन अर्ज?
 

नवीन सदस्य PCRA च्या सेवेद्वारे अटल पेन्शन योजनेसाठी ऑनलाइन अर्ज करू शकतात. याद्वारे तुम्ही एपीवाय सेवा ऑनलाइनही चेकही करू शकाल.
 

तीन प्रकारे नोंदणी करता येणार
 

1. ऑफलाइन XML-आधार आधारित KYC
2. ऑनलाइन आधारित eKYC
3. व्हर्च्युअल आयडी
 

या गोष्टींकडे लक्ष ठेवा
 

1 eAPY नोंदणीमध्ये दिलेली माहिती तुमच्या बँक रेकॉर्डशी जुळते का हे पाहावं लागेल.
2. अटल पेन्शन योजनेचा पहिला हप्ता भरण्यासाठी बचत खात्यात शिल्लक असणं आवश्यक आहे.
3. आधारमध्ये दिलेलं तुमचं नाव आणि जन्मतारीख बरोबर असली पाहिजे.

Web Title: You can invest online in Atal Pension Yojana the government has launched a new service details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.