Lokmat Money >गुंतवणूक > LIC च्या 'या' स्कीममध्ये गुंतवणूक करून मुलीचं भविष्य करू शकता सुरक्षित, १२१ रुपये वाचवून जमेल लाखोंचा फंड

LIC च्या 'या' स्कीममध्ये गुंतवणूक करून मुलीचं भविष्य करू शकता सुरक्षित, १२१ रुपये वाचवून जमेल लाखोंचा फंड

LIC Scheme for Girls: एलआयसीच्या पोर्टफोलिओमध्ये अशा अनेक पॉलिसी आणि योजना आहेत, ज्यात तुम्ही थोडी फार गुंतवणूक करून खूप चांगला फंड जमा करू शकता.

By जयदीप दाभोळकर | Updated: April 21, 2025 11:38 IST2025-04-21T11:29:38+5:302025-04-21T11:38:51+5:30

LIC Scheme for Girls: एलआयसीच्या पोर्टफोलिओमध्ये अशा अनेक पॉलिसी आणि योजना आहेत, ज्यात तुम्ही थोडी फार गुंतवणूक करून खूप चांगला फंड जमा करू शकता.

You can secure your daughter s future by investing in lic kanyadan scheme save Rs 121 you will get 27 lakhs | LIC च्या 'या' स्कीममध्ये गुंतवणूक करून मुलीचं भविष्य करू शकता सुरक्षित, १२१ रुपये वाचवून जमेल लाखोंचा फंड

LIC च्या 'या' स्कीममध्ये गुंतवणूक करून मुलीचं भविष्य करू शकता सुरक्षित, १२१ रुपये वाचवून जमेल लाखोंचा फंड

LIC Scheme for Girls: भारतीय आयुर्विमा महामंडळ अर्थात एलआयसी (LIC) ही भारतातील सर्वात मोठी विमा कंपनी आहे. एलआयसीच्या पोर्टफोलिओमध्ये अशा अनेक पॉलिसी आणि योजना आहेत, ज्यात तुम्ही थोडी फार गुंतवणूक करून खूप चांगला फंड जमा करू शकता. त्याचबरोबर एलआयसीच्या अशा योजनादेखील आहेत ज्यात तुम्ही तुमच्या मुलांच्या नावावर गुंतवणूक करून त्यांचं भविष्य सुरक्षित करू शकता. आज आम्ही तुम्हाला एलआयसीच्या एका योजनेबद्दल सांगणार आहोत, ज्यामध्ये तुम्ही तुमच्या मुलीसाठी गुंतवणूक करू शकता आणि तिचे भविष्य सुरक्षित करू शकता. चला जाणून घेऊया कोणती आहे ही स्कीम.

आम्ही एलआयसीच्या कन्यादान स्कीमबद्दल सांगत आहोत. एलआयसीची ही पॉलिसी खूप खास आहे. या पॉलिसीमध्ये तुम्ही तुमच्या मुलीच्या भविष्यासाठी मोठा निधी जमा करू शकता.

पंतप्रधान जनधन योजनेनं आपलाच विक्रम मोडला, डिपॉझिटची रक्कम उच्चांकी स्तरावर; खातेधारकही वाढले

एलआयसी कन्यादान पॉलिसी

एलआयसीच्या कन्यादान पॉलिसीमध्ये तुम्ही थोडी गुंतवणूक करून तुमच्या मुलीसाठी चांगला फंड जोडू शकता. या योजनेचा मॅच्युरिटी पीरियड १३ ते २५ वर्षांचा आहे. या योजनेची खास गोष्ट म्हणजे या योजनेत तुम्ही दररोज फक्त १२१ रुपयांची बचत करून आपली गुंतवणूक सुरू करू शकता, म्हणजेच दरमहा ३६०० रुपयांपासून गुंतवणूक सुरू करू शकता. या योजनेत तुम्ही तुमच्या १ वर्षापर्यंतच्या मुलीसाठी गुंतवणूक करू शकता.

जमेल २७ लाखांचा फंड

एलआयसीच्या कन्यादान पॉलिसीमध्ये जर तुम्ही तुमच्या मुलीच्या नावे २५ वर्षांसाठी दरमहा १२१ रुपयांनुसार महिन्याला ३६०० रुपये गुंतवू शकता, तर तुम्ही २५ वर्षांनंतर एकूण २७ लाख रुपयांपर्यंतचा फंड गोळा करू शकता. एवढंच नाही तर मॅच्युरिटीपूर्वी पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यास १० लाखांचा निधी दिला जातो.

Web Title: You can secure your daughter s future by investing in lic kanyadan scheme save Rs 121 you will get 27 lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.