Lokmat Money >गुंतवणूक > ₹१००० पासून सुरू करू शकता गुंतवणूक, मॅच्युरिटीवर पैसे होतील दुप्पट; आहे ना कमालीची स्कीम!

₹१००० पासून सुरू करू शकता गुंतवणूक, मॅच्युरिटीवर पैसे होतील दुप्पट; आहे ना कमालीची स्कीम!

प्रत्येकाला आपल्या कष्टानं कमावलेला पैसा अशा ठिकाणी गुंतवायचा असतो जिथे त्यांना केवळ चांगला परतावाच नाही तर, त्यांचा तो पैसाही पूर्णपणे सुरक्षित राहावा असं वाटत असतं.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2024 11:16 AM2024-02-19T11:16:39+5:302024-02-19T11:17:00+5:30

प्रत्येकाला आपल्या कष्टानं कमावलेला पैसा अशा ठिकाणी गुंतवायचा असतो जिथे त्यांना केवळ चांगला परतावाच नाही तर, त्यांचा तो पैसाही पूर्णपणे सुरक्षित राहावा असं वाटत असतं.

You can start investing from rs 1000 the money will double on maturity kisan vikas patra investment scheme benefits | ₹१००० पासून सुरू करू शकता गुंतवणूक, मॅच्युरिटीवर पैसे होतील दुप्पट; आहे ना कमालीची स्कीम!

₹१००० पासून सुरू करू शकता गुंतवणूक, मॅच्युरिटीवर पैसे होतील दुप्पट; आहे ना कमालीची स्कीम!

प्रत्येकाला आपल्या कष्टानं कमावलेला पैसा अशा ठिकाणी गुंतवायचा असतो जिथे त्यांना केवळ चांगला परतावाच नाही तर, त्यांचा तो पैसाही पूर्णपणे सुरक्षित राहावा असं वाटत असतं. जोखीम आणि लहान गुंतवणूकदारांच्या गरजा लक्षात घेऊन, सरकार अनेक छोट्या बचत योजना (Best small saving scheme) चालवत आहे.
 

अशीच एक उत्कृष्ट बचत योजना म्हणजे किसान विकास पत्र. दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी हा एक चांगला पर्याय आहे. किसान विकास पत्रावर (kisan vikas patra) सध्या ७.५ टक्के व्याज दिलं जात आहे. याचा अर्थ असा की जर तुम्ही या योजनेत पैसे गुंतवले तर तुमचे पैसे ११५ महिन्यांत म्हणजे ९ वर्षे आणि सात महिन्यांत दुप्पट होतील.
 

किसान विकास पत्र दहा वर्षांसाठी खरेदी करता येऊ शकतं. यामध्ये किमान गुंतवणूक १,००० रुपये आहे. जास्तीत जास्त गुंतवणुकीवर मर्यादा नाही. म्हणजे तुम्ही त्यात तुम्हाला हवे तितके पैसे गुंतवू शकता. हा गुंतवणुकीचा सुरक्षित मार्ग आहे आणि बाजाराच्या जोखमीच्या अधीन नाही. बाजारात जरी चढउतार दिसून आले तरी यात तुम्हाला हमखास परतावा मिळत असतो.
 

कोण करू शकतं गुंतवणूक?
 

किसान विकास पत्रामध्ये गुंतवणूक करणाऱ्या व्यक्तीचं वय किमान १८ वर्षे असणं आवश्यक आहे. सिंगल अकाऊंट व्यतिरिक्त जॉइंट अकाउंटचीही यात सुविधा मिळते. त्याच वेळी, ही योजना अल्पवयीन मुलांसाठी देखील उपलब्ध आहे, परंतु या खात्याची देखरेख त्यांच्या पालकांना करावी लागते. यामध्ये गुंतवणूक करण्यासाठी १००० रुपये, ५००० रुपये, १०,००० रुपये आणि ५०,००० रुपयांची प्रमाणपत्रं आहेत.
 

वन टाईम इन्व्हेस्टमेंट स्कीम
 

किसान विकास पत्र ही भारत सरकारची वन टाईम इन्व्हेस्टमेंट स्कीम आहे, जिथे तुमचे पैसे एका निश्चित कालावधीत दुप्पट होतात. तुम्ही किसान विकास पत्र देशातील सर्व पोस्ट ऑफिस आणि मोठ्या बँकांमधून खरेदी करू शकता. प्रमाणपत्र खरेदी करताना नॉमिनेशन सुविधादेखील उपलब्ध आहे. केव्हीपी प्रमाणपत्र खरेदी करताना तुम्ही नॉमिनी केलं नसल्यास, तुम्ही मुदतपूर्तीपूर्वी कधीही नॉमिनेशन करू शकता.
 

टॅक्स बेनिफिट मिळतं का?
 

किसान विकास पत्रामध्ये गुंतवणूक केल्यावर, तुम्हाला मिळालेल्या व्याज उत्पन्नावर कर भरावा लागेल. तर आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत, तुम्हाला या योजनेत जमा केलेल्या रकमेवर कोणताही कर लाभ मिळत नाही.

 

Web Title: You can start investing from rs 1000 the money will double on maturity kisan vikas patra investment scheme benefits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.