Join us  

Post Office च्या ‘या’ स्कीम्समध्ये मिळतं बँक एफडीपेक्षा अधिक व्याज, पाहा डिटेल्स

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2023 12:19 PM

तुमच्या पैशांचे योग्य व्यवस्थापन करण्यासाठी, गुंतवणुकीसोबतच पैशांची बचत करणे अत्यंत आवश्यक आहे.

तुमच्या पैशांचे योग्य व्यवस्थापन करण्यासाठी, गुंतवणुकीसोबतच (Money Investment) पैशांची बचत (Money Saving) करणे अत्यंत आवश्यक आहे. आपण वाचवलेल्या पैशातून आपण आपल्या भविष्यातील गरजा पूर्ण करू शकतो. याशिवाय आपले बचतीचे पैसे आपल्याला कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत खूप उपयोगी पडतात. 

पैसे वाचवण्यासाठी, बहुतेक लोक बँक एफडी किंवा इतर बँकिंग योजनांवर अधिक अवलंबून असतात. परंतु तुम्ही बँक एफडी ऐवजी पोस्ट ऑफिस योजनेद्वारे तुमच्या बचतीच्या पैशावर अधिक लाभ मिळवू शकता. अलीकडच्या काळात असे दिसून आले आहे की बहुतांश बँका बचत योजनांवर अत्यंत कमी व्याजदर देतात. त्याच वेळी, बहुतेक पोस्ट ऑफिस स्कीम्समध्ये व्याजदर जवळजवळ सर्व बँकांपेक्षा अधिक आहे. पोस्ट ऑफिसच्या त्या योजनांबद्दल जाणून घेऊया.

पोस्ट ऑफिस टाईम डिपॉझिट स्कीम - पोस्ट ऑफिस टाईम डिपॉझिट स्कीम ही सर्वात लोकप्रिय लहान बचत योजनांपैकी एक आहे. ही योजना जी पाच वर्षांच्या कालावधीसाठी मुदत ठेवीवर 6.7 टक्के परतावा देते. या योजनेचे दर पाच वर्षांनी नूतनीकरण देखील केले जाऊ शकते, ज्यामुळे तो दीर्घकालीन बचतीचा पर्याय बनतो.

सीनिअर सिटीझन सेव्हिंग स्कीम - ही पोस्ट ऑफिस स्कीम विशेषतः ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरू करण्यात आली आहे. ही योजना तुमच्या बचतीवर 8 टक्के व्याज देते. याशिवाय या योजनेत गुंतवणुकीचा कोणताही धोका नाही आणि पैशाच्या सुरक्षिततेचीही पूर्ण हमी आहे.

टॅग्स :पोस्ट ऑफिसगुंतवणूक