Lokmat Money > बिझनेस न्यूज > SBI नं कोट्यवधी ग्राहकांना दिला झटका, खिशाला कात्री; कार लोन, होम लोनचा EMI वाढणार

SBI नं कोट्यवधी ग्राहकांना दिला झटका, खिशाला कात्री; कार लोन, होम लोनचा EMI वाढणार

देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक स्टेट बँक ऑफ इंडियानं (SBI) कोट्यवधी ग्राहकांना झटका दिला आहे. एसबीआयनं आज १५ जुलैपासून म्हणजेच कर्जाच्या दरात बदल केला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2024 11:31 AM2024-07-15T11:31:24+5:302024-07-15T11:32:26+5:30

देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक स्टेट बँक ऑफ इंडियानं (SBI) कोट्यवधी ग्राहकांना झटका दिला आहे. एसबीआयनं आज १५ जुलैपासून म्हणजेच कर्जाच्या दरात बदल केला आहे.

SBI gave a shock to crores of customers Car loan home loan EMI will increase mlcr rate hike know details | SBI नं कोट्यवधी ग्राहकांना दिला झटका, खिशाला कात्री; कार लोन, होम लोनचा EMI वाढणार

SBI नं कोट्यवधी ग्राहकांना दिला झटका, खिशाला कात्री; कार लोन, होम लोनचा EMI वाढणार

SBI Home Loan Rate: देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक स्टेट बँक ऑफ इंडियानं (SBI) कोट्यवधी ग्राहकांना झटका दिला आहे. एसबीआयनं आज १५ जुलैपासून कर्जाच्या दरात बदल केला आहे. एमसीएलआर हा असा दर आहे ज्यापेक्षा कमी दरानं बँक ग्राहकाला कर्ज देऊ शकत नाही. एसबीआय बँकेनं एमसीएलआर दरात ०.१० टक्क्यांची वाढ केली आहे. एमसीएलआरचे नवे सुधारित दर आज, १५ जुलै २०२४ पासून लागू झाले आहेत.

आता एसबीआयचा बेस लेंडिंग रेट एमसीएलआर ८.१० ते ९ टक्के झाला आहे. ओव्हरनाईट एमसीएलआर दर आता ८.२० टक्के झाला आहे. एसबीआयनं एमसीएलआरमध्ये ०.०५ टक्के ते ०.१० टक्क्यांपर्यंत वाढ केलीये. एमसीएलआरचा थेट परिणाम तुमच्या होम आणि कार लोनच्या ईएमआयवर होतो. एमसीएलआरचे दर वाढल्यानं नवीन कर्जेही महाग होतात. तसंच तुमच्या होम आणि कार लोनचा ईएमआय वाढतो.

किती केला एमएलसीआरमध्ये बदल?

स्टेट बँकेनं ओव्हरनाईट एमएलसीआर ८.१० टक्के कायम ठेवला आहे. तर एका महिन्याचा एमएलसीआर ८.३० टक्क्यांवरुन वाढवून ८.३५ टक्के करण्यात आलाय. याशिवाय तीन महिन्यांचा एमएलसीआर ८.३० टक्क्यांवरुन ८.४० टक्के, सहा महिन्यांचा एमएलसीआर ८.६५ टक्क्यांवरुन ८.७५ टक्के, एका वर्षाचा एमएलसीआर ०.१० टक्क्यांनी वाढवून ८.८५ टक्के करण्यात आलाय. तर दुसरीकडे दोन आणि तीन वर्षांच्या एमएलसीआरमध्येही बदल करण्यात आले असून तो अनुक्रमे ८.८५ टक्क्यांवरून ८.९५ टक्के आणि ८.९५ टक्क्यांवरून ९ टक्के इतका करण्यात आलाय.

Web Title: SBI gave a shock to crores of customers Car loan home loan EMI will increase mlcr rate hike know details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.