नवी दिल्लीः लॉकडाऊनमुळे बँकांची कामंही मंदावली आहेत. त्यातच कोरोनामुळे अर्थव्यवस्थाही कोलमडली आहे. त्याच पार्श्वभूमीवर बँकांचे नियम सातत्यानं बदल असतात. भारतातील सर्वात मोठी बँक असलेल्या एसबीआयनं लॉकडाऊनच्या काळात एटीएममधून पैसे काढण्याच्या नियमांत बदल केला होता. तो कालावधी ३० जून २०२०ला संपुष्टात आला. आता एसबीआयनं पुन्हा एकदा एटीएममधून पैसे काढण्याच्या नियमांत बदल केला आहे.
एसबीआय खातेदार ज्यांचे सरासरी मासिक शिल्लक रक्कम 25000 आहे, ते कोणतेही शुल्क न भरता 8 वेळा बँकेच्या एटीएममधून पैसे काढू शकतात. ज्यामध्ये एसबीआय एटीएममधून 5 वेळा आणि इतर एटीएममधून 3 वेळा पैसे काढता येऊ शकतात. 25000 ते 50000च्या सरासरी शिल्लक खातेदार शुल्काशिवाय 10 वेळा रोख रक्कम काढू शकतात. 50000 ते 1,00,000 रुपयांची सरासरी शिल्लक असलेले खातेदार बँक एटीएममधून 8 वेळा शुल्क न आकारता पैसे काढू शकतात. सरासरी 1,00,000 रुपयांपेक्षा जास्त रक्कम असलेल्या खातेदारांना बँक एटीएममधून पैसे काढण्यास कोणतेही बंधन नाही. ते कितीही वेळा बँकेच्या एटीएममधून पैसे काढू शकतात. मोफत मर्यादेनंतर रोख रक्कम काढण्यासाठी एसबीआय 5 ते 8 रुपये जीएसटीच्या स्वरूपात वसूल करते.
>> मेट्रो शहरांमध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय)आपल्या नियमित बचत खातेदारांना एका महिन्यात 8 विनामूल्य व्यवहार करण्याची परवानगी देते. याव्यतिरिक्त प्रत्येक व्यवहारावर ग्राहकांकडून शुल्क आकारले जाते. एसबीआयच्या sbi.co.in च्या अधिकृत वेबसाइटवर ही माहिती उपलब्ध आहे.
>>मेट्रो नसलेल्या शहरांमध्ये 10 विनामूल्य एटीएम व्यवहार करण्याची सुविधा मिळते, ज्यामध्ये एसबीआय आणि इतर बँकांकडून 5-5 वेळा व्यवहार करता येतात.
हेही वाचा
अखेर शिवराजसिंह चौहानांच्या मंत्रिमंडळाचा 'जंबो' विस्तार; जाणून मंत्र्यांची संपूर्ण लिस्ट
...म्हणून मोदींच्या हिमतीला दाद द्यावीच लागेल; शिवसेनेची अॅपबंदीवर 'टिक', पण भाजपाला 'टोक'लं!
मोठी बातमी! राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन २०३६पर्यंत रशियावर सत्ता गाजवणार
चीनची कबुली! भारतात TikTok अॅप बंद झाल्यानं होणार अब्जावधी डॉलरचं नुकसान
कोरोना देशातून जाणार नाही, जुलै अन् ऑगस्टमध्ये मोठा फैलाव होणार, भारतीय संशोधकांचा गंभीर इशारा
बापरे! कोरोनापाठोपाठ नव्या संकटाचा वैज्ञानिकांचा इशारा, शेतकऱ्यांना सतर्कतेच्या सूचना
आजचे राशीभविष्य - 2 जुलै 2020; 'या' राशीच्या व्यक्तींना कौटुंबिक जीवनात सुखांचा अनुभव मिळेल