Lokmat Money > बिझनेस न्यूज > SBI मध्ये होणार १० हजार पदांसाठी भरती; कधी जारी केली जाणार अधिसूचना?

SBI मध्ये होणार १० हजार पदांसाठी भरती; कधी जारी केली जाणार अधिसूचना?

SBI : बँक ६०० नवीन शाखा उघडण्याचा विचार करत आहे. या शाखांमध्ये अनेक पदांवर भरती केली जाईल. 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2024 05:05 PM2024-10-07T17:05:51+5:302024-10-07T17:06:33+5:30

SBI : बँक ६०० नवीन शाखा उघडण्याचा विचार करत आहे. या शाखांमध्ये अनेक पदांवर भरती केली जाईल. 

SBI plans to recruit around 10,000 new employees during FY25 for efficiency | SBI मध्ये होणार १० हजार पदांसाठी भरती; कधी जारी केली जाणार अधिसूचना?

SBI मध्ये होणार १० हजार पदांसाठी भरती; कधी जारी केली जाणार अधिसूचना?

स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच एसबीआयमध्ये (SBI) यंदा १०००० पदांसाठी भरती केली जाणार आहे. यासंदर्भात एसबीआयनं घोषणा केली आहे. सर्वसाधारण प्रक्रिया आणि तांत्रिक क्षमता वाढवण्यासाठी भरती केली जाईल. बँक ६०० नवीन शाखा उघडण्याचा विचार करत आहे. या शाखांमध्ये अनेक पदांवर भरती केली जाईल. 

ही भरती कोण-कोणत्या पदांसाठी केली जाईल, याबद्दल बँकेकडून अद्या कोणतीही अधिकृत माहिती शेअर करण्यात आलेली नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, डिसेंबरपर्यंत या भरतीसाठी अधिसूचना जारी केली जाऊ शकते. मात्र, यासाठी एसबीआयने जाहिरात प्रसिद्ध करण्याची कोणतीही अधिकृत तारीख जाहीर केलेली नाही.

SCO साठी अर्ज प्रक्रिया सुरू
दरम्यान, एसबीआयमध्ये स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसरच्या  (SCO) १४९७  पदांसाठी भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू आहे. बँकेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ४ ऑक्टोबर ते १४ ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. उमेदवार बँकेच्या अधिकृत वेबसाइट sbi.co.in वर जाऊन अर्ज करू शकतात. १४ सप्टेंबरपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. लेखी परीक्षा इत्यादी प्रक्रियेद्वारे निवड केली जाईल. तसेच, अधिक माहितीसाठी तुम्ही एसबीआयने जारी केलेली अधिसूचना तपासू शकता.

SBI PO साठी अधिसूचना कधी प्रसिद्ध होणार?
याचबरोबर, एसबीआय पीओ भरती अधिसूचना देखील लवकरच प्रसिद्ध केली जाईल. गेल्या वर्षी एसबीआय पीओ भरती अधिसूचना ६ सप्टेंबर रोजी प्रसिद्ध झाली होती. ७ सप्टेंबरपासून अर्ज प्रक्रिया सुरू झाली आणि एकूण २००० पीओ पदांसाठी भरती करण्यात आली. दरम्यान, या भरतीसाठी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातील पदवीधर उमेदवार अर्ज करू शकतात. या महिन्यात अधिसूचना जारी होण्याची शक्यता आहे. एसबीआयच्या अधिकृत वेबसाईटवर भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली जाईल.

Web Title: SBI plans to recruit around 10,000 new employees during FY25 for efficiency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.