नवी दिल्लीः SBIने (स्टेट बँक ऑफ इंडिया) आपल्या ग्राहकांना दिलासा देत मोठी गूड न्यूज दिली आहे. SBIनं कर्जाच्या व्याजदरांमध्ये कपात केली आहे. बँकेने अल्प मुदतीच्या एमसीएलआर दर (MCLR) 0.05 टक्के ते 0.10 टक्क्यांनी कमी करण्याची घोषणा केली आहे. या निर्णयानंतर एसबीआय दर 6.65 टक्क्यांवर आला आहे. सध्या SBIचे एमसीएलआर दर देशात सर्वात कमी असल्याचा बँकेचा दावा आहे. नवीन दर 10 जुलैपासून लागू होणार आहेत. जूनमध्येही SBIने व्याजदर कमी करण्याचा निर्णय घेतला होता. 10 जून रोजी एसबीआयचे एमसीएलआर दर 0.25 टक्क्यांनी घसरून 7 टक्क्यांवर आले होते. 22 मे रोजी रेपो रेटे 0.40 टक्क्यांनी घसरण करत ते दर 4 टक्क्यांवर आले होते. यानंतर पंजाब नॅशनल बँक, बँक ऑफ इंडिया आणि युको बँक यांनी रेपो आणि एमसीएलआरशी संबंधित त्यांचे कर्जे दर आधीच कमी केले आहेत.
एसबीआयने बाह्य बेंचमार्क लिंक्ड लेन्डिंग रेट (ईबीआर) आणि रेपो लिंक्ड लेन्डिंग रेट (आरएलएलआर)चे दरही कमी केले आहेत. 1 जुलैपासून या दोन्ही दरांमध्ये 0.40 टक्के कपात करण्यात आली आहे. या कपातीनंतर वार्षिक ईबीआर 7.05 टक्क्यांवरून 6.65 टक्क्यांवर आला आहे. त्याचप्रमाणे आरएलएलआर 6.65 टक्क्यांवरून 6.25 टक्क्यांवर आला आहे. 30 वर्षांच्या 25 लाखांच्या कर्जावर, एमसीएलआर अंतर्गत मासिक हप्त्यात सुमारे 421 रुपयांची बचत होणार आहे. त्याचप्रमाणे ईबीआर आणि आरएलएलआर अंतर्गत मासिक हप्ता 660 रुपयांनी कमी होणार आहे.
एमसीएलआर म्हणजे काय - एमसीएलआर म्हणजे यावर बँकांकडून घेतलेल्या कर्जाच्या ईएमआयचा दर ठरतो. याच्यापेक्षा कमी दरात देशातील कोणतीच बँक कर्ज देऊ शकत नाही. एमसीएलआर वाढल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठं नुकसान सहन होतं. एमसीएलआर वाढल्यामुळे घेतलेलं कर्ज महाग होतं आणि पहिल्यापेक्षा जास्त कर्जाचा हफ्ता द्यावा लागतो. तर एमसीएलआरच्या दरात घट झाली तर कर्जाचा हफ्ताही कमी होतो. MCLR हा दर खाली आल्यानं बँक कमी दराने कर्ज देऊ शकेल, जेणेकरून गृह कर्ज ते वाहन कर्जे घेणे स्वस्त होईल. परंतु हा लाभ नवीन ग्राहकांबरोबरच एप्रिल 2016नंतर ज्या ग्राहकांनी कर्ज घेतले आहे, त्यांनाही मिळणार आहे. कारण त्यापूर्वी कर्ज देण्यासाठी किमान दर निश्चित करण्यात आला होता. म्हणजेच बँका यापेक्षा कमी दराने कर्ज देऊ शकत नाहीत.
हेही वाचा
भारतीय अर्थव्यवस्थेच्या घसरणीवर रघुराम राजन म्हणतात...
STFने आठ पोलिसांची हत्या करणाऱ्या विकास दुबेचा उजवा हात असलेल्या अमर दुबेला केले ठार
मुलांच्या उज्ज्वल 'भविष्या'साठी 'या' बँकेनं सुरू केले नवे खाते, मिळणार भरपूर फायदे