देशाची मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने आपल्या ग्राहकांसाठी उत्सवाच्या दिवसांमध्ये मोठी भेट दिली आहे. सणाच्या दिवशी घर खरेदी करण्याच्या तयारीत असलेल्या लोकांचा आनंद द्विगुनित करण्यासाठी एसबीआयने व्याजदरात 25 बीपीएस सूट देण्य़ाची घोषणा केली आहे. यामुळे 75 लाखांपर्यंतच्या गृहकर्जावर 25 बेसिस पॉईंटची सूट मिळणार आहे. महत्वाचे म्हणजे ही सूट सिबिल स्कोअरच्या आधारे आणि योनो अॅपच्या माध्यमातून अर्ज करणाऱ्यांना दिली जाणार आहे.
SBI-ICICI आणि HDFC ग्राहकांसाठी मोठी बातमी; डेबिट-क्रेडिट कार्डचे नियम बदलले
SBI ने नुकत्याच फेस्टिव ऑफर्स जाहीर केल्या आहेत. यामध्ये एसबीआय देशभरात 30 लाख ते 2 कोटी रुपयांच्या गृहकर्जासाठी क्रेडिट स्कोअरच्या आधारे 10 ते 20 बीपीएस व्याजात सूट देत आहे. ही सूट देशातील आठ मेट्रो शहरांमध्ये 3 कोटींचे कर्ज घेणाऱ्यांसाठीही मिळणार आहे. योनोच्या माध्यमातून अर्ज करणाऱ्या सर्व गृहकर्जावर अतिरिक्त 5 बीपीएस सूट दिली जाणार आहे. म्हणजेच ही सूट 25 बीपीएस एवढी असणार आहे. एसबीआय 30 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जावर कमी व्य़ाजदर आकारते. हा व्याजदर 6.90 टक्क्यांपासून सुरु होतो. तर त्यावरील कर्जासाठीचा व्याजदर हा 7 टक्क्यांपासून सुरु होतो. ही सूट नव्या ग्राहकांना लागू होणार आहे.
खुशखबर! SBI ने बदलला 'हा' नियम; ४४ कोटी ग्राहकांना कर्जासाठी फायदा होणार
एसबीआयने अन्य प्रकारच्या कर्जांसाठीदेखील ऑफर जाहीर केली आहे. यामध्ये कार लोन, गोल्ड, पर्सनल लोनवरील प्रोसेसिंग फीमध्ये देखील 100 टक्के सूट देण्याची घोषणा केली आहे. त्याचबरोबर रिटेल ग्राहकांसाठीही विशेष ऑफरची घोषणा केली आहे. कार लोनवर 7.5 टक्के व्याजदर ठेवण्यात आला असून याचा लाभ ग्राहक घेत आहेत. गोल्ड लोन आणि पर्सनल लोनवर अनुक्रमे 7.5 आणि 9.6 टक्के व्याज आकारले जात आहे. योनो अॅपच्या माध्यमातून ग्राहक कागदरहित कर्ज वितरण प्रणालीचा वापर करत आहेत.
रिटेल और डिजिटल बँकिंगचे एमडी सीएस शेट्टी यांनी सांगितले की, कोरोना काळातील लॉकडाऊननंतर ग्राहकांची मागणी वाढली आहे. ते पाहून आम्ही ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी यापुढेही चांगल्या योजना आणत जाऊ. या योजनेद्वारे लोकांना त्यांचे स्वप्नातील घर बनविण्यास मदत मिळणार आहे.