Lokmat Money > बिझनेस न्यूज > सेबी प्रमुख माधबी बूच यांच्या अडचणी वाढल्या, संसदेच्या वरिष्ठ समितीने बजावले समन्स

सेबी प्रमुख माधबी बूच यांच्या अडचणी वाढल्या, संसदेच्या वरिष्ठ समितीने बजावले समन्स

PAC summons to Sebi chairperson Madhabi Puri Buch: सेबी अध्यक्षा माधबी पुरी बूच यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. संसदेच्या उच्च स्तरीय पीएसी अर्थात लोक लेखा समितीने त्यांना चौकशीला हजर राहण्यासाठी समन्स बजावले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2024 02:04 PM2024-10-05T14:04:03+5:302024-10-05T14:07:16+5:30

PAC summons to Sebi chairperson Madhabi Puri Buch: सेबी अध्यक्षा माधबी पुरी बूच यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. संसदेच्या उच्च स्तरीय पीएसी अर्थात लोक लेखा समितीने त्यांना चौकशीला हजर राहण्यासाठी समन्स बजावले आहे.

SEBI chief Madhabi Buch's troubles mount, summons issued by Parliament's PAC | सेबी प्रमुख माधबी बूच यांच्या अडचणी वाढल्या, संसदेच्या वरिष्ठ समितीने बजावले समन्स

सेबी प्रमुख माधबी बूच यांच्या अडचणी वाढल्या, संसदेच्या वरिष्ठ समितीने बजावले समन्स

SEBI Chairperson Madhabi Buch PAC Summons News:सेबी अध्यक्षा माधबी पुरी बूच या हिंडेनबर्ग रिपोर्टनंतर वादात सापडल्या असून, त्यांच्या अडचणी वाढताना दिसत आहे. संसदेची सर्वोच्च समिती असलेल्या लोक लेखा समितीने माधबी पुरी बूच यांना चौकशीला हजर राहण्यासाठी समन्स बजावले आहे. इतकंच नाही, तर महसूल विभागातील अधिकाऱ्यांनाही चौकशीसंदर्भात समन्स पाठवण्यात आले आहे. माधबी पुरी बूच आणि इतर अधिकाऱ्यांना २४ ऑक्टोबर रोजी हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. 

पीएसी अर्थात लोक लेखा समिती संसदेची वरिष्ठ समिती आहे. या समितीमध्ये २२ सदस्य असतात. महत्त्वाचे म्हणजे या समितीच्या सदस्यांना सरकारमध्ये मंत्री होता येत नाही. केंद्र सरकारचा महसूल आणि खर्च यांचे ऑडिट करण्याचे काम ही समिती करते. 

लोक लेखा समितीचे माधबी पुरी बूच यांना समन्स

इकॉनॉमिक्स टाइम्सच्या रिपोर्टनुसार, लोक लेखा समितीने (Public Accounts Committee) महसूल विभागातील वरिष्ठ अधिकारी आणि आयटी कंपनी इन्फोसिसलाही समन्स बजावले आहे. या कंपनीला समन्स पाठवण्याचे कारण म्हणजे जीएसटी संकलन आणि अलिकडेच पाठवण्यात आलेल्या नोटीसचा पुर्नआढावा घेण्यासंदर्भात आहे. 

लोक लेखा समितीचे अध्यक्ष काँग्रेसचे नेते आणि खासदार केसी वेणुगोपाल आहेत. या समितीमध्ये सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील खासदारांचा समावेश आहे. 

माधबी पुरी बूच यांना लोक लेखा समितीने समन्स का बजावले?

अमेरिका स्थित हिंडेनबर्ग रिसर्चने सेबी अध्यक्षा माधबी पुरी बूच आणि त्यांचे पती धवल बूच यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. अदानी समूहाशी संबंधित परदेशातील फंडामध्ये दोघांची हिस्सेदारी असल्याचा दावा हिंडेनबर्गने केला आहे. हिंडेनबर्गने केलेले आरोप माधबी पुरी बूच, त्यांचे पती धवल बूच आणि अदानी समूहाने आधीच फेटाळून लावलेले आहेत. या संदर्भात आता लोक लेखा समिती चौकशी करत आहे.

Web Title: SEBI chief Madhabi Buch's troubles mount, summons issued by Parliament's PAC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.