मल्टीबॅगर स्मॉल कॅप स्टॉक सुदर्शन फार्माच्या शेअर्समध्ये सातत्याने वाढ होत आहे. कंपनीचा शेअर आज 1.3% वाढून 42.55 रुपयांच्या इंट्राडे उच्चांकावर पोहोचला. शेअरच्या या वाढीचे मुख्य कारण म्हणजे, सेंच्युरी इंडिया अपॉर्च्युनिटी फंडाने मोठी हिस्सेदारी खरेदी केली आहे. सेंच्युरी इंडिया अपॉर्च्युनिटी फंडाने सुदर्शन फार्मा इंडस्ट्रीजचे 1600000 शेअर्स खरेदी केल्याचे बीएसई बल्क डील्स डेटावरून दिसून येते. सेंच्युरी इंडिया अपॉर्च्युनिटी फंडाची सरासरी खरेदी किंमत ₹41.97 होती.
सुदर्शन फार्मा इंडस्ट्रीजचा शेअर शुक्रवारी बीएसईवर ₹41.20 वर खुला झाला, जो भाव ₹42.00 या गेल्या बंदच्या तुलनेत 2% ने कमी आहे. यानंतर, सेंच्युरी इंडिया अपॉर्च्युनिटी फंडने सुदर्शन फार्मामध्ये हिस्सेदारी खरेदी केल्याच्या वृत्तानंतर, सुदर्शन फार्मा इंडस्ट्रीजचे शेअर्स वधारले. सुदर्शन फार्मा इंडस्ट्रीजचे शेअर्स इंट्राडेमध्ये ₹42.55 या उच्चांकी पातळीवर पोहोचले.
शेअरनं दिला मल्टीबॅगर परतावा -
सुदर्शन फार्मा इंडस्ट्रीजच्या शेअरची किंमत ₹46 या 52 आठवड्यांच्या उच्चांकावर आहे. जी 25 नोव्हेंबर 2024 रोजी वाढली होती. या शेअरची किंमत जून 2024 मध्ये प्रति शेअर ₹5.82 या 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीवरून मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. हा शेअर गेल्या सहा महिन्यांत 600% ने वाधारला आहे. सुदर्शन फार्मा इंडस्ट्रीजच्या शेअर्सच्या किमतीत गेल्या एका वर्षात 445% ची वाढ झाली आहे आणि त्याने मल्टीबॅगर परतावा दिला आहे. या वर्षात आतापर्यंत हा शेअर 430% एवढा वधारला आहे.