Lokmat Money > बिझनेस न्यूज > TCS, बजाज अन् महिंद्राच्या शेअर्समध्ये जोरदार वाढ; Sensex पहिल्यांदाच 81000 पार...

TCS, बजाज अन् महिंद्राच्या शेअर्समध्ये जोरदार वाढ; Sensex पहिल्यांदाच 81000 पार...

Share Market Today: आजच्या सत्रात सेन्सेक्स आणि निफ्टीने आतापर्यंतचा सर्वोच्च उच्चांक गाठला.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2024 04:26 PM2024-07-18T16:26:33+5:302024-07-18T16:27:04+5:30

Share Market Today: आजच्या सत्रात सेन्सेक्स आणि निफ्टीने आतापर्यंतचा सर्वोच्च उच्चांक गाठला.

Shares of TCS, Bajaj and Mahindra goes up; Sensex crosses 81000 for the first time | TCS, बजाज अन् महिंद्राच्या शेअर्समध्ये जोरदार वाढ; Sensex पहिल्यांदाच 81000 पार...

TCS, बजाज अन् महिंद्राच्या शेअर्समध्ये जोरदार वाढ; Sensex पहिल्यांदाच 81000 पार...

Stock Market Closing On 18 July 2024 :शेअर बाजारातगुंतवणूक करणाऱ्यांसाठी आजचा दिवस (दि.18) खुप 'लकी' ठरला. आजच्या सत्रात Sensex ने पहिल्यांदाच 81 हजारांचा टप्पा ओलांडला आहे. सकाळी बाजार सुरू होताच घसरण पाहायला मिळाली, पण दुपारच्या कामकाजादरम्यान सेन्सेक्सने ऐतिहासिक उंची गाठली. दुसरीकडे, राष्ट्रीय शेअर बाजाराच्या Nifti ने पहिल्यांदाच 24700 ची पातळी ओलांडली. 

आजच्या सत्रात आयटी आणि एफएमसीजी शेअर्समध्ये झालेल्या जोरदार खरेदीमुळे बाजारात मजबूत स्थितीत पोहोचला. आजच्या व्यवहाराअंती बीएसई सेन्सेक्स 627 अंकांच्या उसळीसह 81,343 वर बंद झाला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 187 अंकांच्या उसळीसह 24,800 वर बंद झाला.

मार्केट कॅपमध्ये घसरण
सेन्सेक्स-निफ्टी ऐतिहासिक उच्चांकावर बंद झाला, तरीही शेअर बाजाराच्या बाजार भांडवलात घसरण झाली. मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समधील प्रॉफिट बुकींगमुळे मार्केट कॅप घसरले. बीएसईवर सूचीबद्ध शेअर्सचे मार्केट कॅप 454.36 लाख कोटी रुपयांवर बंद झाले, जे गेल्या सत्रात 455.24 लाख कोटी रुपये होते. म्हणजेच, आजच्या सत्रात गुंतवणूकदारांचे 90 हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

सेक्टरॉल अपडेट्स
आजच्या व्यवहारात सर्वात जास्त वाढ आयटी शेअर्समध्ये दिसून आली. निफ्टीचा आयटी निर्देशांक 2.22 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाला. याशिवाय बँकिंग, ऑटो, एफएमसीजी, ऊर्जा, आरोग्य सेवा आणि तेल आणि वायू क्षेत्राचे शेअर्स वधारले. तर, कंझ्युमर ड्युरेबल्स, मेटल आणि फार्मा शेअर्समध्ये घसरण दिसून आली.

वाढणारे आणि घसरणारे शेअर्स
आजच्या व्यवहारात सर्वात जास्त फायदा TCS मध्ये झाला. हा शेअर 3.33 टक्क्यांनी वाढला. याशिवाय बजाज फिनसर्व्ह 2.57 टक्के, महिंद्रा अँड महिंद्रा 2.32 टक्के, इन्फोसिस 1.93 टक्के, एचयूएल 1.74 टक्के, टेक महिंद्रा 1.60 टक्क्यांनी वाढले. तर, एशियन पेंट्स 1.48 टक्के, जेएसडब्ल्यू स्टील 0.89 टक्के, एनटीपीसी 0.71 टक्के, अदानी पोर्ट्स 0.52 टक्के घसरुन बंद झाले.

(टीप- शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्या.)

Web Title: Shares of TCS, Bajaj and Mahindra goes up; Sensex crosses 81000 for the first time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.