shilchar technologies : गेल्या ६ महिन्यांपासून शेअर बाजार प्रचंड अस्थिर आहे. ट्रम्प टॅरिफने यात आणखी भर टाकली आहे. अशा परिस्थितीतही काही कंपन्यांनी गुंतवणूकदारांना बंपर परतावा दिला आहे. यामध्ये शिल्चर टेक्नॉलॉजीज लिमिटेड कंपनीचे नाव आवर्जून घ्यावं लागेल. कंपनी त्यांच्या गुंतवणूकदारांना लाभांश आणि बोनस दोन्ही देऊ शकते. ही ट्रान्सफॉर्मर उत्पादक कंपनी पुढील आठवड्यात होणाऱ्या बैठकीत बोनस आणि लाभांश जाहीर करू शकते. कंपनीच्या २०२४-२५ या आर्थिक वर्षाच्या आणि ३१ मार्च २०२५ रोजी संपणाऱ्या तिमाहीच्या आर्थिक निकालांवर चर्चा करून त्यांना मान्यता दिली जाईल.
कंपनीने सांगितले की बैठकीदरम्यान एक महत्त्वाचा अजेंडा असेल, ज्यामध्ये इक्विटी शेअरधारकांना बोनस शेअर्स देण्याचा प्रस्ताव समाविष्ट असेल. २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी इक्विटी शेअर्सवर अंतरिम लाभांश देण्याच्या शिफारशींवरही बैठकीत विचार केला जाऊ शकतो, असे फाइलिंगमध्ये म्हटले आहे. तसेच, ३९ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेदरम्यान, वेळ, तारीख आणि स्वरूप निश्चित केले जाईल आणि सभेच्या मसुद्याच्या सूचनेला मान्यता दिली जाईल, असेही सांगितले.
शिल्चर टेक्नॉलॉजीजचा बंपर परतावा :
गेल्या एका महिन्यात शिल्चर टेक्नॉलॉजीजच्या शेअर्समध्ये सकारात्मक वाढ दिसली आहेत. कंपनीने १८ टक्क्यांहून अधिक वाढ पाहिली आहे. तीन महिन्यांत हा शेअर २६.७७ टक्के आणि ६ महिन्यांत १८.५९ टक्के घसरला आहे. तर या स्टॉकने दोन वर्षांत ६५३.७३ टक्के आणि ५ वर्षांत १४८५१.२९ टक्के असा जबरदस्त परतावा दिला आहे. म्हणजे तुम्ही ५ वर्षांपूर्वी या कंपनीत १ लाख रुपये गुंतवले असते तर आज त्याचे १.५ कोटी रुपये झाले असते.
ही कंपनी ट्रान्सफॉर्मर निर्मितीच्या क्षेत्रात काम करते. शिल्चर इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकॉम तसेच वीज आणि वितरण क्षेत्रात सेवा पुरवते. शिल्चर यांनी अलीकडेच फेराइट ट्रान्सफॉर्मरच्या निर्मितीच्या क्षेत्रात पाऊल ठेवून त्यांच्या कामात विविधता आणण्याचा प्रयत्न केला आहे.
(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ही शेअर बाजारातील जोखमीच्या अधीन असते. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)