Lokmat Money > बिझनेस न्यूज > Ratan Tata News Live: ज्ञानी-दानी अन् स्वाभिमानी 'भारत रतन'; देश गहिवरला, मान्यवरांची रतन टाटांना श्रद्धांजली

Ratan Tata News Live: ज्ञानी-दानी अन् स्वाभिमानी 'भारत रतन'; देश गहिवरला, मान्यवरांची रतन टाटांना श्रद्धांजली

Ratan Tata Death News : रतन टाटा या नावाला कुठल्याही ओळखीची गरज नाही. भारताचे ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांचे बुधवारी रात्री निधन झालं.

LIVE

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2024 12:52 AM2024-10-10T00:52:46+5:302024-10-10T01:56:06+5:30

Ratan Tata Death News : रतन टाटा या नावाला कुठल्याही ओळखीची गरज नाही. भारताचे ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांचे बुधवारी रात्री निधन झालं.

sir ratan tata passed away at 86 years in mumbai breach candy hospital live updates details | Ratan Tata News Live: ज्ञानी-दानी अन् स्वाभिमानी 'भारत रतन'; देश गहिवरला, मान्यवरांची रतन टाटांना श्रद्धांजली

Ratan Tata News Live: ज्ञानी-दानी अन् स्वाभिमानी 'भारत रतन'; देश गहिवरला, मान्यवरांची रतन टाटांना श्रद्धांजली

Ratan Tata News : रतन टाटा या नावाला कुठल्याही ओळखीची गरज नाही. भारताचे ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांचे बुधवारी रात्री निधन झालं. वयाच्या ८६ व्या वर्षी त्यांनी मुंबईतील रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. रतन टाटा यांच्या व्यक्तिमत्त्वावर नजर टाकली तर ते केवळ उद्योजकच नाही, तर ते उदार व्यक्ती, लोकांसाठी आदर्श आणि प्रेरणास्थान होते. 

 

 

LIVE

Get Latest Updates

10 Oct, 24 : 01:31 AM

सदैव मदतीचा हात देणे हा रतन टाटा यांचा स्वभाव सदैव स्मरणात राहील - शरद पवार

जगभरात आपल्या गौरवास्पद कामगिरीतून देशाचा लौकीक वाढवणारे टाटा समूहाचे अध्यक्ष उद्योगपती रतन टाटा यांनी जगाचा निरोप घेतला. देशावर ओढवणाऱ्या नैसर्गिक अथवा मानवी अशा प्रत्येक संकटावर मात करण्यासाठी सदैव मदतीचा हात देणे हा रतन टाटा यांचा स्वभाव सदैव स्मरणात राहील, असं म्हणत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी टाटा यांना आदरांजली वाहिली.

 

10 Oct, 24 : 01:27 AM

मुकेश अंबानी ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल

रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल झाले आहेत. रतन टाटा यांचं वयाच्या ८६ व्या वर्षी निधन झालं. ते काही काळापासून आजारी होते.

10 Oct, 24 : 01:24 AM

भारताने एक दिग्गज, दूरदर्शी व्यक्ती गमावली : गौतम अदानी

"भारताने एक दिग्गज, दूरदर्शी व्यक्ती गमावली आहे, ज्यांनी आधुनिक भारताचा मार्ग नव्याने परिभाषित केला. रतन टाटा हे केवळ एक व्यावसायिक नेतृत्व नव्हतं - त्यांनी प्रामाणिकपणा, करुणा आणि व्यापक हितासाठी अढळ बांधिलकीसह भारताच्या भावनेला मूर्त रूप दिले. त्यांच्यासारखे दिग्गज कधीच कधीत जात नाहीत. ओम शांती", असं म्हणत उद्योजक गौतम अदानी यांनी त्यांना आदरांजली वाहिली.

 

10 Oct, 24 : 01:18 AM

ही भारतीय उद्योगजगताची मोठी हानी - अजित पवार

प्रत्येक भारतीयाच्या मनात प्रेम, आदर, आपुलकीचं स्थान निर्माण करणाऱ्या रतन टाटा यांचं निधन ही भारतीय उद्योगजगताची मोठी हानी आहे. टाटा परिवार आणि रतन टाटा यांच्या चाहत्यांच्या दु:खात मी सहभागी असून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. रतन टाटा यांना सद्गती लाभो, अशी प्रार्थना करतो,” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उद्योगपती रतन टाटा यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त करुन त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे.

 

 

10 Oct, 24 : 01:13 AM

"तुम्हाला विसरता येणार नाही," आनंद महिंद्रांची भावूक पोस्ट

"रतन टाटा आपल्यात नाहीत यावर विश्वासच बसत नाही. भारताची अर्थव्यवस्था तेजीत आहे आणि रतन टाचा यांचं जीवन आणि कार्याचं यात मोठं योगदान आहे. या स्थितीत त्यांचं मार्गदर्शन मोलाचं ठरलं असतं," अशी भावूक पोस्ट महिंद्रा अँड महिंद्राचे प्रमुख आनंद महिंद्रा यांनी केली.

10 Oct, 24 : 01:10 AM

"रतन टाटा यांच्या योगदानामुळे केवळ टाटा समूहच नव्हे तर आपल्या देशाची जडणघडण घडली"

"आम्ही रतन नवल टाटा यांना अत्यंत दु:खाने निरोप दिला. खऱ्या अर्थाने एक असाधारण नेतृत्व ज्यांच्या अतुलनीय योगदानामुळे केवळ टाटा समूहच नव्हे तर आपल्या देशाची जडणघडण ही घडून आली," अशी प्रतिक्रिया टाटा सन्सचे चेअरमन एन. चंद्रशेखरन यानी दिली.

10 Oct, 24 : 01:05 AM

"नैतिकता आणि उद्यमशीलता यांचा  अपूर्व आणि आदर्श संगम रतन टाटा यांच्या ठायी"

नैतिकता आणि उद्यमशीलता यांचा  अपूर्व आणि आदर्श संगम रतन टाटा यांच्या ठायी होता. सुमारे १५० वर्षांची श्रेष्ठत्व आणि सचोटीची परंपरा असलेल्या टाटा ग्रुपची जबाबदारी यशस्वीरित्या पेलणारे रतनजी टाटा हे एक जीवंत आख्यायिका होते.  त्यांनी वेळोवेळी दाखविलेला निर्णायक खंबीरपणा आणि मानसिक कणखरपणी टाटा ग्रूपला वेगळ्या औद्योगिक उंचीवर घेऊन गेला. त्यांना मी आदरपूर्वक श्रद्धांजली अर्पण करतो. रतनजी टाटा यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जातील, असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रतन टाटा यांना आदरांजली वाहिली.

10 Oct, 24 : 01:03 AM

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल

10 Oct, 24 : 01:00 AM

पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून रतन टाटांना आदरांजली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रतन टाटा यांचा फोटो शेअर करत त्यांना आदरांजली वाहिली. "मी मुख्यमंत्री असताना त्यांची गुजरातमध्ये वारंवार भेट होत असे. आम्ही विविध मुद्द्यांवर विचार विनिमय करत होतो. मला त्यांचा दृष्टीकोन खूप समृद्ध वाटला. मी दिल्लीत आलो, तेव्हाही आमचे संवाद सुरूच होते. त्यांच्या निधनानं अत्यंत दु:ख झालं आहे," असं म्हणत पंतप्रधानांनी रतन टाटा यांना आदरांजली वाहिली.
"