Join us

Share Market: 1 रुपयाचा शेअर तब्बल 1900 रुपयांवर, गुंतवणूकदार बनले करोडपती

By ऑनलाइन लोकमत | Published: December 06, 2022 11:38 AM

कोटक महिंद्रा बँकेच्या शेअरधारकांना कंपनीतील शेअर्सने मालामाल केले आहे.

शेअर मार्केटमध्ये तेजी-मंदी होत असते, पण लाँग टर्म गुंतवणूक ही गुंतवणूकदारांना नेहमीच फायदेशीर ठरते, असे मार्केटमधील तज्ज्ञ सांगतात. अनेकदा त्याचा प्रत्ययही आपणास आला आहे. त्यामुळेच, गुंतवणूकदार विचारपूर्वक आणि भविष्यातील फायदे ओळखून कंपन्यांचे शेअर्स विकत घेतात. कोटक महिंद्राच्या लाँग टर्म इन्व्हेस्टमेंटमध्ये गुंतवणूक केलेल्या भागधारकांना कंपनीने कोट्यधीश बनवले आहे. 

कोटक महिंद्रा बँकेच्या शेअरधारकांना कंपनीतील शेअर्सने मालामाल केले आहे. कारण, गेल्या २० वर्षात या शेअर्सचे भाव गगनाला भिडले असून गुंतवणूकदार कोट्यधीश बनले आहेत. आकडेवारीचा अभ्यास केल्यास, २००१-०२ मध्ये कोटक महिंद्रा बँकेचा शेअर १.७० रुपये एवढा होता. आता, २०२२ च्या शेवटच्या महिन्यात गुंतवणूकदारांना रिटर्न्स देताना कंपनीचा हा शेअर १९३४ रुपयांवर पोहोचला आहे. 

याचाच अर्थ, या बँकींग शेअर्समध्ये २० वर्षांपूर्वी ज्यांनी १ लाख रुपयांची गुंतवणूक केली आहे. त्यांना आजमित्तीस ११ कोटी रुपये मिळणार आहेत. म्हणजेच या शेअर्सने लाँग टर्म गुंतवणूकदारांना करोडपती बनवलं आहे. या कंपनीबाबत मार्केट एक्सपर्टचा सल्लाही सकारात्मक असून आणखी तेजी येण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळेच, या शेअर्सला Buy रेटींग देण्यात आलं आहे. 

गेल्या १० वर्षांत अशी वाढली किंमत 

२ नोव्हेंबर   २०१२    ३०६१ नोव्हेंबर   २०१३    ३७६७ नोव्हेंबर   २०१४    ५६११३ नोव्हेंबर २०१५    ६७६१८ नोव्हेंबर २०१६    ७७९१७ नोव्हेंबर २०१७    १०२३९ नोव्हेंबर   २०१८    ११३५२२ नोव्हेंबर २०१९    १५६९२० नोव्हेंबर  २०२०   १८८९१२ नोव्हेंबर २०२१    २०७४५  नोव्हेंबर  २०२२    १९३४

टॅग्स :शेअर बाजारव्यवसायमुंबई