Lokmat Money >शेअर बाजार > १० मिनिटांची डिलिव्हरी Swiggy, Zomato ला पडली महागात; NRAI च्या एका निर्णयानं मोठं नुकसान 

१० मिनिटांची डिलिव्हरी Swiggy, Zomato ला पडली महागात; NRAI च्या एका निर्णयानं मोठं नुकसान 

पाहा काय आहे प्रकरण. स्विगी आणि झोमॅटोची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2025 15:20 IST2025-01-10T15:20:50+5:302025-01-10T15:20:50+5:30

पाहा काय आहे प्रकरण. स्विगी आणि झोमॅटोची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.

10 minute delivery cost Swiggy Zomato Big loss due to NRAI s decision share huge loss | १० मिनिटांची डिलिव्हरी Swiggy, Zomato ला पडली महागात; NRAI च्या एका निर्णयानं मोठं नुकसान 

१० मिनिटांची डिलिव्हरी Swiggy, Zomato ला पडली महागात; NRAI च्या एका निर्णयानं मोठं नुकसान 

Swiggy and Zomato Share: बाजारातील चढउतारांमुळे ऑनलाइन फूड डिलिव्हरी कंपन्यांच्या शेअरमध्ये शुक्रवारी मोठी घसरण पाहायला मिळाली. फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म स्विगी आणि झोमॅटोचे शेअर्स आठवड्याच्या शेवटच्या दिवशी ट्रेडिंगदरम्यान ३.६ टक्क्यांपर्यंत घसरले. स्विगीचा शेअर ४९० रुपयांच्या खाली घसरला, तर झोमॅटोच्या शेअरची किंमत २४० रुपयांच्या खाली आला. नॅशनल रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ इंडियानं (एनआरएआय) झोमॅटो आणि स्विगीविरोधात भारतीय स्पर्धा आयोगाकडे (सीसीआय) धाव घेतली आहे.

काय आहे प्रकरण?

खरं तर, एनआरएआयने झोमॅटो आणि स्विगीच्या नुकत्याच विविध अॅप्सद्वारे क्विक कॉमर्स फुड डिलिव्हरीच्या निर्णयाला विरोध केला आहे. एनआरएआयच्या म्हणण्यानुसार, ब्लिंकिट बिस्ट्रो आणि स्विगी स्नॅक सारख्या स्वतःच्या क्विक कॉमर्स प्लॅटफॉर्मद्वारे खासगी-लेबल फूड डिस्ट्रिब्युट करणाऱ्या दोन फूड डिलिव्हरी दिग्गज बाजाराच्या तटस्थतेचे उल्लंघन करतात, ज्यामुळे स्पर्धेची असमान पातळी निर्माण होते.

झोमॅटो आणि स्विगी स्वत:हून खासगी लेबलिंग आणि खाद्यपदार्थांची विक्री करत आहेत, हे आम्हाला अजिबात मान्य नाही. झोमॅटो ब्लिंकिटच्या स्वतंत्र बिस्ट्रो अॅपच्या माध्यमातून आणि स्विगीनं त्वरिक जेवण देण्यासाठी स्नॅक्स सादर केलंय, असं एनआरएआयचे अध्यक्ष सागर दरयानी म्हणाले. एनआरएआयच्या म्हणण्यानुसार, झोमॅटो आणि स्विगी त्यांच्या नेटवर्क डेटाचा फायदा घेऊन थेट किंवा त्यांच्या उपकंपन्यांद्वारे खाजगी-लेबल फूड डिलिव्हरी करत आहेत. ही रणनीती केवळ या प्लॅटफॉर्मवर अवलंबून असलेल्या रेस्तराँ व्यवसायावर संकट आणत नाही तर, कॉपीराइट कायदा आणि संबंधित कायद्यांअंतर्गत गंभीर चिंता देखील वाढवतं.

स्नॅक आणि बिस्ट्रो झाले लाँच

स्विगीने १५ मिनिटांत नाश्ता, ड्रिंक आणि जेवण देण्यासाठी स्नॅक डिझाइन केला आहे. झोमॅटोनं नुकतेच ब्लिंकिटच्या माध्यमातून बिस्ट्रो लाँच केलं आहे, जे १० मिनिटांत स्नॅक्स, फूड आणि ड्रिंक्स डिलिव्हरी करण्याचा दावा करते.

Web Title: 10 minute delivery cost Swiggy Zomato Big loss due to NRAI s decision share huge loss

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.