Lokmat Money >शेअर बाजार > ₹7 च्या शेअरला लागल 10% चं अप्पर सर्किट, खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड!

₹7 च्या शेअरला लागल 10% चं अप्पर सर्किट, खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड!

हा शेअर खरेदी करण्यासाठी शुक्रवारी गुंतवणूकदारांची झुंबड उडाली होती आणि याची किंमत 7.98 रुपयांपर्यंत पोहोचली.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2024 01:33 AM2024-02-18T01:33:38+5:302024-02-18T01:34:27+5:30

हा शेअर खरेदी करण्यासाठी शुक्रवारी गुंतवणूकदारांची झुंबड उडाली होती आणि याची किंमत 7.98 रुपयांपर्यंत पोहोचली.

10percent upper circuit for a vallabh steels share of rs 7, flock of investors to buy | ₹7 च्या शेअरला लागल 10% चं अप्पर सर्किट, खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड!

₹7 च्या शेअरला लागल 10% चं अप्पर सर्किट, खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड!

शेअर बाजारात गेल्या शुक्रवारी तेजी दिसून आली. या दरम्यान काही पेनी स्टॉकलाही चांगलीच मागणी होती. असाच एक पेनी स्टॉक वल्लभ स्टील्स या आयरन अँड स्टील प्रोडक्ट्सशी संबंधित कंपनीचा आहे. हा शेअर खरेदी करण्यासाठी शुक्रवारी गुंतवणूकदारांची झुंबड उडाली होती आणि याची किंमत 7.98 रुपयांपर्यंत पोहोचली. तथापि, शेअरच्या 52 आठवड्यांच्या उच्चांकाच्या तुलनेत हा शेअर अजूनही मागेच आहे.

शेअरची किंमत - 
गुरुवारी वल्लभ स्टील्सचे शेअर्स 7.26 रुपयांवर बंद केल्यानंतर, शुक्रवारी व्यवहार सुरू झाला, तेव्हा शेअरला 10 टक्क्यांचे अप्पर सर्किट लागले. यानंतर शेअरचा भाव 7.98 रुपयांवर पोहोचला. 26 सप्टेंबर 2023 रोजी हा शेअर 9.11 रुपयांवर पोहोचला होता. हा या शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांक आहे. तर 28 मार्च 2023 रोजी शेअरची किंमत 4.43 रुपयांपर्यंत घसरली. हा या शेअरचा 52 आठवड्यांचा नीचांक आहे.

वल्लभ स्टील्सचे तिमाही निकाल -
डिसेंबर तिमाहीसंदर्भात बोलायचे झाल्यास, या कालावधीत वल्लभ स्टिल्सला 0.43 कोटी रुपयांचा घाटा झाला आहे. खरे तर, एक वर्षापूर्वीच्या याच कालावधीच्या तुलनेत कंपनीने 3.26 कोटी रुपयांचा घाटा नोंदवला आहे. कंपनीने या कालावधीच्या सेल्स रिपोर्टसंदर्भात माहिती दिलेली नाही.

(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)

Web Title: 10percent upper circuit for a vallabh steels share of rs 7, flock of investors to buy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.