Join us  

कंपनीला मिळाली ११३५ कोटींची ऑर्डर, नफा २०० टक्क्यांनी वाढला; कमाईचे रेकॉर्ड तोडणार हा शेअर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2023 1:43 PM

स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करून बंपर कमाई करण्यासाठी मल्टीबॅगर शेअर्स निवडणं आणि त्यात गुंतवणूक करणं आवश्यक आहे

स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करून बंपर कमाई करण्यासाठी मल्टीबॅगर शेअर्स निवडणं आणि त्यात गुंतवणूक करणं आवश्यक आहे. मल्टीबॅगर शेअर्सच्या सीरिजमध्ये आज आम्ही तुम्हाला अशाच एका शेअरबद्दल सांगत आहोत, ज्या शेअरनं गेल्या एका महिन्यात गुंतवणूकदारांना मोठे रिटर्न्स दिले आहेत.

स्किपर लिमिटेड (Skipper Limited) नावाची ही कंपनी नव्या ट्रान्समिशन लाईन प्रोजेक्ट्सचे डिझाईन, सप्लाय आणि कंन्स्ट्रक्शन व्यवसायात कार्यरत आहे. स्किपर लिमिटेडला भारतातील आघाडीची पॉवर ट्रान्समिशन कंपनी पॉवर लिमिटेडकडून ११३५ कोटी रुपयांची ऑर्डर मिळाली आहे. कंपनी लॅटिन अमेरिका, मध्य पूर्व आणि उत्तर आफ्रिका रिजनमध्ये टॉवर आणि उपकरणं पुरवण्याचंही काम करते. स्किपर लिमिटेडचे तिमाही निकालदेखील अतिशय उत्तम होते. गेल्या आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीत, कंपनीचा महसूल ₹ ६५७ कोटींवर पोहोचला आहे. तर नफा ₹ ७३ कोटींवर पोहोचला.

निव्वळ नफा २०० टक्क्यांनी वाढलातिमाही आधारावर कंपनीच्या निव्वळ नफ्यात २०० टक्क्यांची वाढ झाली आहे. स्कीपर लिमिटेडची स्थापना १९८१ मध्ये झाली. कंपनी पॉवर ट्रान्समिशन, डिस्ट्रिब्युशन आणि पॉलिमर मॅन्युफॅक्चरिंगमध्ये काम करते. ४० वर्षांच्या अनुभवासह ही भारतातील सर्वात मोठी आणि जगातील दहावी सर्वात मोठी कंपनी आहे. स्कीपर लिमिटेड  हाय क्वालिटी आणि कॉस्ट इफेक्टिव्ह उपाय प्रदान करून आपला व्यवसाय वाढवत आहे. 

मोठा रिटर्नस्किपर लिमिटेडच्या शेअर्नं एका दिवसात गुंतवणूकदारांना ४ टक्क्यांचा परतावा दिला आहे. जर आपण गेल्या ५ दिवसांच्या कामगिरीबद्दल बोललो, तर स्किपर लिमिटेडच्या शेअर्सनी गुंतवणूकदारांना सुमारे ७ टक्क्यांचा रिटर्न दिलाय. गुरुवार, १ जून रोजी कंपनीचे शेअर्स ११२ रुपयांच्या पातळीवर होते. दरम्यान, यातून गुंतवणूकदारांना आतापर्यंत ३२ रुपयांचा रिटर्न मिळाला आहे. या वर्षी २८ मार्च रोजी कंपनीचे शेअर्स ९० रुपयांच्या पातळीवर होते. इथून गुंतवणूकदारांना आतापर्यंत ५० टक्क्यांपेक्षा अधिक परतावा मिळाला आहे.

टॅग्स :गुंतवणूकशेअर बाजारपैसा