Lokmat Money >शेअर बाजार > १३ लाख कोटी स्वाहा झाल्यानंतर मार्केटला "अच्छे दिन", Sensex ४०० अंकांनी वधारला

१३ लाख कोटी स्वाहा झाल्यानंतर मार्केटला "अच्छे दिन", Sensex ४०० अंकांनी वधारला

अमेरिकेच्या घोषणेचा परिणाम जगभरातील शेअर बाजारांवर नकारात्मक झाला.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2022 10:08 AM2022-09-27T10:08:32+5:302022-09-27T10:08:59+5:30

अमेरिकेच्या घोषणेचा परिणाम जगभरातील शेअर बाजारांवर नकारात्मक झाला.

13 Lakh Crore Swaya, Stock Market Bullish, Sensex Gains 400 Points | १३ लाख कोटी स्वाहा झाल्यानंतर मार्केटला "अच्छे दिन", Sensex ४०० अंकांनी वधारला

१३ लाख कोटी स्वाहा झाल्यानंतर मार्केटला "अच्छे दिन", Sensex ४०० अंकांनी वधारला

मुंबई - अमेरिकेने गतसप्ताहात व्याजदरामध्ये केलेल्या वाढीने जगभरातील शेअर बाजार अस्थिर असलेले दिसून आले. त्याचा परिणाम भारतीय बाजारावरही होऊन निर्देशांकांमध्ये घट झालेली दिसून आली. आगामी सप्ताहात डेरिव्हेटिव्हजची सौदापूर्ती आणि रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीची बैठक या दोन घडामोडी आहेत. रिझर्व्ह बँकेकडून व्याजदरामध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात असून, त्याचा बाजारावर नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता आहे. मात्र, आज अनेक दिवसांनी शेअर बाजारात तेजी पाहायला मिळाली. सेन्सेक्स ४८१.७१ अंकांनी वधारला आहे. तर, निफ्टीतही १४३ अंकांनी वाढ झाली आहे. 

अमेरिकेच्या घोषणेचा परिणाम जगभरातील शेअर बाजारांवर नकारात्मक झाला. परिणामी डॉलर मजबूत होऊन रुपयाला मोठ्या घसरणीचा सामना करावा लागला. अमेरिकेतील व्याजदरामधील वाढ ही परकीय वित्तसंस्थांना फलदायी ठरणार आहे. त्यामुळे त्यांनी भारतीय बाजारात विक्रीचा क्रम  कायम राखला. यामुळे बाजार आणखी खाली गेला. गेल्या ४ दिवसांत भारतीय बाजारात १३ लाख कोटीं बुडाले होते. सोमवारीही बाजारात मोठी मंदी पाहिला मिळाल्यानंतर मंगळवारी बाजारात तेजी आली आहे. मुंबई स्टॉक्स एक्सचेंज आणि भारतीय शेअर मार्केटमध्येही सकाळी ग्रीन सिग्नल पाहायला मिळाला. 

मुंबई शेअर बाजारात निर्देशांकात ४८१.७१ अंकांनी वाढ होऊन निर्देशांक ५७,६२६.९३ अंशांवर पोहोचला आहे. ५० कंपन्यांवाला भारतीय शेअर बाजार म्हणजे निफ्टीत १४३ अंकांची वाढ तो निर्देशांक १७,१५९.३० अंशांवर पोहोचला आहे. 

दरम्यान, यापूर्वी सोमवारी सगल चौथ्या दिवशी बाजारात मंदी दिसून आली, त्यासह मार्केट बंद झाले. त्यादरम्यान, गुंतवणूकदारांच्या संपत्तीत १३.३० लाखांची घट झाली. शेवटच्या दिवशी मुंबई ३० च्या निर्देशांकात ९५३.७० अंकांची घसरण झाली तर निफ्टीच्या अंकात ३११.०५ अंकांची घसरण झाली होती. 
 

Web Title: 13 Lakh Crore Swaya, Stock Market Bullish, Sensex Gains 400 Points

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.