Lokmat Money >शेअर बाजार > Orient Technologies Share Price : IPO मध्ये २०६ रुपये किंमत, पहिल्याच दिवशी ३०० पार; लिस्टिंग होताच 'या' शेअरला लागलं अपर सर्किट

Orient Technologies Share Price : IPO मध्ये २०६ रुपये किंमत, पहिल्याच दिवशी ३०० पार; लिस्टिंग होताच 'या' शेअरला लागलं अपर सर्किट

Orient Technologies Share Price : आयटी सोल्यूशन्स पुरवणाऱ्या कंपनीनं शेअर बाजारात जबरदस्त एन्ट्री घेतली आहे. दमदार लिस्टिंगनंतर ओरिएंट टेक्नॉलॉजीजच्या शेअरनं ३०० रुपयांचा टप्पा ओलांडला.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2024 11:48 AM2024-08-28T11:48:23+5:302024-08-28T11:50:21+5:30

Orient Technologies Share Price : आयटी सोल्यूशन्स पुरवणाऱ्या कंपनीनं शेअर बाजारात जबरदस्त एन्ट्री घेतली आहे. दमदार लिस्टिंगनंतर ओरिएंट टेक्नॉलॉजीजच्या शेअरनं ३०० रुपयांचा टप्पा ओलांडला.

206 in IPO price 300 above on listing day Orient Technologies Share hits upper circuit first day bse nse | Orient Technologies Share Price : IPO मध्ये २०६ रुपये किंमत, पहिल्याच दिवशी ३०० पार; लिस्टिंग होताच 'या' शेअरला लागलं अपर सर्किट

Orient Technologies Share Price : IPO मध्ये २०६ रुपये किंमत, पहिल्याच दिवशी ३०० पार; लिस्टिंग होताच 'या' शेअरला लागलं अपर सर्किट

Orient Technologies Share Price : आयटी सोल्यूशन्स पुरवणाऱ्या ओरिएंट टेक्नॉलॉजीज या कंपनीनं शेअर बाजारात जबरदस्त एन्ट्री घेतली आहे. दमदार लिस्टिंगनंतर ओरिएंट टेक्नॉलॉजीजच्या शेअरनं ३०० रुपयांचा टप्पा ओलांडला. आयपीओमध्ये ओरिएंट टेक्नॉलॉजीजच्या शेअरची किंमत २०६ रुपये होती. कंपनीचे शेअर्स बीएसई आणि एनएसई या दोन्ही एक्स्चेंजमध्ये लिस्टेड आहेत. ओरिएंट टेक्नॉलॉजीजचा आयपीओ २१ ऑगस्ट २०२४ रोजी बोलीसाठी खुला झाला आणि २३ ऑगस्टपर्यंत खुला राहिला. लिस्टिंगनंतर कंपनीच्या शेअरला अपर सर्किट लागलं.

३०० रुपयांचा टप्पा ओलांडला

आयपीओमध्ये ओरिएंट टेक्नॉलॉजीजच्या शेअरची किंमत २०६ रुपये होती. ओरिएंट टेक्नॉलॉजीजचा शेअर बुधवारी मुंबई शेअर बाजारात ४०.७ टक्क्यांच्या प्रीमियमसह २९० रुपयांवर लिस्ट झाला. लिस्टिंगनंतर लगेचच बीएसईवर कंपनीचा शेअर ५ टक्क्यांनी वधारून ३०४.४५ रुपयांवर पोहोचला. तर एनएसईवर ओरिएंट टेक्नॉलॉजीजचा शेअर ३९.८१ टक्के प्रीमियमसह २८८ रुपयांवर लिस्ट झाला. लिस्टिंगनंतर एनएसईवर कंपनीचा शेअर ५ टक्क्यांनी वधारुन ३०२.४० रुपयांवर पोहोचला.

मिळालेला जबरदस्त रिस्पॉन्स

कंपनीचा आयपीओ एकूण १५४.८४ पट सब्सक्राइब झाला होता. आयपीओमध्ये किरकोळ गुंतवणूकदारांचा कोटा ६८.९३ पट सब्सक्राइब झाला. तर नॉन इन्स्टिट्युशनल इनव्हेस्टर्सच्या (एनआयआय) श्रेणीत ३१०.०३ पट, क्वालिफाइड इन्स्टिट्यूशनल बायर्स (क्यूआयबी) श्रेणीत १८८.७९ पट सबस्क्रिप्शन मिळालं होतं. ओरिएंट टेक्नॉलॉजीजच्या आयपीओमध्ये किरकोळ गुंतवणूकदार कमीत कमी १ लॉट आणि जास्तीत जास्त १३ लॉटसाठी बोली लावता येणार होती.

आयपीओच्या एका लॉटमध्ये ७२ शेअर्स आहेत. म्हणजेच रिटेल गुंतवणूकदारांना कंपनीच्या आयपीओमध्ये किमान १४८३२ रुपयांची गुंतवणूक करावी लागणार होती. ओरिएंट टेक्नॉलॉजीजचा एकूण पब्लिक इश्यू साईज २१४.७६ कोटी रुपये होती. आयपीओपूर्वी कंपनीतील प्रवर्तकांचा हिस्सा ९७.९६ टक्के होता, जो आता ७३.२१ टक्के होणार आहे.

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: 206 in IPO price 300 above on listing day Orient Technologies Share hits upper circuit first day bse nse

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.