Lokmat Money >शेअर बाजार > श्रीसिमेंटवर 23000 कोटींच्या करचोरीचा आरोप; एका झटक्यात 9200 कोटी बुडाले

श्रीसिमेंटवर 23000 कोटींच्या करचोरीचा आरोप; एका झटक्यात 9200 कोटी बुडाले

देशातील मोठ्या सिमेंट कंपन्यांपैकी एक असलेल्या 'श्री सिमेंट'वर 23,000 कोटी रुपयांची करचोरी केल्याचा आरोप लागला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2023 02:52 PM2023-06-26T14:52:09+5:302023-06-26T15:19:01+5:30

देशातील मोठ्या सिमेंट कंपन्यांपैकी एक असलेल्या 'श्री सिमेंट'वर 23,000 कोटी रुपयांची करचोरी केल्याचा आरोप लागला आहे.

23000 crore tax evasion charges against Shree cement; 9200 crores in one fell swoop | श्रीसिमेंटवर 23000 कोटींच्या करचोरीचा आरोप; एका झटक्यात 9200 कोटी बुडाले

श्रीसिमेंटवर 23000 कोटींच्या करचोरीचा आरोप; एका झटक्यात 9200 कोटी बुडाले


देशातील सर्वात मोठ्या सिमेंट कंपन्यांपैकी एक असलेल्या 'श्री सिमेंट'वर 23,000 कोटी रुपयांची करचोरी केल्याचा आरोप लागला आहे. त्यामुळे सोमवारी कंपनीचे शेअर 10 टक्क्यांनी घसरले आणि कंपनीच्या मार्केट कॅपम सुमारे 9200 कोटी रुपयांनी कमी झाला. ट्रेडिंग सत्रादरम्यान कंपनीचा शेअर 25 हजार रुपयांवरुन 22 हजार रुपयांच्या पातळीवर आला. सध्या कंपनीचा शेअर 23 हजार रुपयांच्या पातळीवर व्यवहार करत आहे. 

आयकर विभागाने गेल्या आठवड्यात कंपनीच्या पाच ठिकाणांचे सर्वेक्षण करण्याची प्रक्रिया सुरू केली होती. बेवार, जयपूर, चित्तोडगड आणि अजमेर येथील कंपनीच्या प्लांटवर छापे टाकण्यात आले. गेल्या दोन दिवसात कंपनीच्या शेअर्समध्ये 12 टक्क्यांहून अधिक घसरण झाली आहे.

कंपनीचे स्पष्टीकरण 
कंपनीने आपल्या प्रसिद्धीपत्रकात आयकर सर्वेक्षणाबाबत स्पष्टीकरण देताना म्हटले की, कंपनीची संपूर्ण व्यवस्थापन टीम अधिकाऱ्यांना पूर्ण सहकार्य करत आहे आणि माध्यमांमध्ये प्रसारित होणारी माहिती चुकीची आहे. 

कंपनीच्या शेअर्समध्ये घसरण
सकाळी 11:57 वाजता कंपनीचा शेअर बीएसईवर 8 टक्क्यांनी घसरून 23,150 रुपयांवर व्यवहार करत होता. गेल्या वर्षी कंपनीच्या स्टॉकमध्ये 22 टक्क्यांनी वाढ झाली होती. 21 फेब्रुवारी रोजी कंपनीच्या शेअरने 27,000 रुपयांची पातळी ओलांडली होती. आपण आजच्या दिवसाबद्दल बोललो तर, ट्रेडिंग सत्रादरम्यान, कंपनीचा शेअर 22601.30 रुपयांसह दिवसाच्या नीचांकी पातळीवर पोहोचला. या बातमीमुळे कंपनीचे मार्केट कॅप 90,724.49 कोटींवरुन 81,547.17 कोटी झाले आहे. 

 

Web Title: 23000 crore tax evasion charges against Shree cement; 9200 crores in one fell swoop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.