Join us  

ECOS India Mobility IPO : पैसे तयार ठेवा! २५ वर्ष जुन्या कंपनीचा येतोय IPO; आता ४१% प्रीमिअमवर शेअर; २८ ऑगस्टपासून संधी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2024 11:01 AM

ECOS India Mobility IPO : हा इश्यू २८ ऑगस्टला गुंतवणूकदारांसाठी खुला होईल. यासाठी प्रति शेअर ३१८ ते ३३४ रुपये असा प्राइस बँड निश्चित करण्यात आली आहे.

ECOS (India) Mobility IPO: जर तुम्ही आयपीओमध्ये पैसे गुंतवण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक बातमी आहे. या आठवड्यात आणखी एका कंपनीचा आयपीओ गुंतवणुकीसाठी खुला होत आहे. हा आयपीओ इकोस (इंडिया) मोबिलिटी अँड हॉस्पिटॅलिटी लिमिटेडचा आहे. हा इश्यू २८ ऑगस्टला गुंतवणूकदारांसाठी खुला होईल. इन्व्हेस्टर इकोस (इंडिया) मोबिलिटी अँड हॉस्पिटॅलिटी लिमिटेडचा आयपीओ ३० ऑगस्ट रोजी बंद होणार आहे. यासाठी प्रति शेअर ३१८ ते ३३४ रुपये असा प्राइस बँड निश्चित करण्यात आली आहे.

काय आहेत डिटेल्स?

ईसीओएस (इंडिया) मोबिलिटी अँड हॉस्पिटॅलिटी लिमिटेडनं दिलेल्या माहितीनुसार गुंतवणूकदारांसाठी हा आयपीओ २८ ऑगस्ट रोजी उघडेल. यामध्ये प्रत्येकी २ रुपयांची फेस व्हॅल्यू असलेल्या १८,०००,००० इक्विटी शेअर्सच्या ऑफर फॉर सेलचा समावेश आहे. यामध्ये कमीत कमी ४४ इक्विटी शेअर्स खरेदी करता येतील.

काय आहे ग्रे मार्केट प्रीमिअम?

Investorgain.com दिलेल्या माहितीनुसार, इकोस (इंडिया) मोबिलिटी अँड हॉस्पिटॅलिटी लिमिटेडचा आयपीओ ग्रे मार्केटमध्ये १३४ रुपयांच्या प्रीमियमवर उपलब्ध आहे. याची अपेक्षित लिस्टिंग किंमत ४६८ रुपये आहे. म्हणजेच कंपनीचा शेअर पहिल्या दिवशी ४१ टक्के नफा मिळवून देऊ शकतो. कंपनीच्या शेअर्सचं लिस्टिंग ४ सप्टेंबरला होणार आहे.

ईसीओएस मोबिलिटी अँड हॉस्पिटॅलिटी लिमिटेड कॉर्पोरेट ग्राहकांना भाड्यानं कार पुरविण्याचं काम करते आणि एम्पलॉईड ट्रान्सपोर्ट सेवा प्रदान करते. २५ वर्षांहून अधिक अनुभव असलेली ही कंपनी देशातील १०० हून अधिक शहरांमध्ये काम करत आहे.

(टीप : यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :इनिशिअल पब्लिक ऑफरिंगशेअर बाजार