Join us

लिस्टिंगच्या २० दिवसांतच 'या' शेअरमध्ये २५०% ची वाढ; खरेदीसाठी उड्या, स्टॉकमध्ये विक्रमी तेजी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 06, 2024 4:05 PM

Sahasra Electronics Solutions share: कंपनीच्या शेअरमध्ये आजच्या व्यवहारात तब्बल १९ टक्क्यांनी वाढ झाली आणि तो ९६९.९५ रुपयांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला.

Sahasra Electronics Solutions share: सहस्र इलेक्ट्रॉनिक सोल्यूशन्स लिमिटेडच्या शेअर्समध्ये बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जबरदस्त तेजी दिसून आली. कंपनीच्या शेअरमध्ये आजच्या व्यवहारात तब्बल १९ टक्क्यांनी वाढ झाली आणि तो ९६९.९५ रुपयांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला. ही या शेअरची ५२ आठवड्यांतील ही नवी उच्चांकी किंमत आहे. 

कंपनीचे शेअर्स नुकतेच लिस्ट झाले होते. सहस्र इलेक्ट्रॉनिक सोल्यूशन्स लिमिटेडचे शेअर्स ४ ऑक्टोबर रोजी एनआयएसईवर ९० टक्के प्रीमियमवर लिस्ट झाले होते. त्याच्या आयपीओची किंमत २८३ रुपये निश्चित करण्यात आली होती. म्हणजेच आयपीओच्या किमतीच्या तुलनेत हा शेअर आतापर्यंत २५० टक्क्यांपर्यंत वधारला आहे.

सहस्र इलेक्ट्रॉनिक सोल्युशन्स लिमिटेडच्या शेअर्समध्ये झालेल्या या वाढीमागे मोठी डील आहे. एक्स-रे उपकरणांमध्ये वापरल्या जाणाऱ्या एफपीडीचं (फ्लॅट पॅनेल डिटेक्टर) उत्पादन आणि सर्व्हिसिंगसाठी स्ट्रॅटेजिक अलायन्स तयार करण्यासाठी कंपनीनं इनोकेअर ऑप्टोइलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन लिमिटेडसोबत सामंजस्य करार केला आहे. इनोकेअरचे अध्यक्ष एरिक ली आणि सहस्राचे संचालक वरुण मनवानी यांच्यात २४ ऑक्टोबर रोजी तैवानमध्ये इनोलक्स कॉर्पोरेशनचे अध्यक्ष जेम्स यांग यांच्या उपस्थितीत हा करार करण्यात आला.

सप्टेंबर तिमाहीचे निकाल कसे?

सहस्र इलेक्ट्रॉनिक सोल्युशन्स लिमिटेडचा ऑपरेटिंग रेव्हेन्यू ९१० टक्क्यांनी वाढून आर्थिक वर्ष २०२३ च्या १० कोटी रुपयांवरून आर्थिक वर्ष २०२४ मध्ये १०१ कोटी रुपये झाला. ऑक्टोबर २०२४ पर्यंत सहस्र इलेक्ट्रॉनिक सोल्युशन्स लिमिटेडकडे प्रवर्तकांचा ६९.९० टक्के, विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांचा ३.५० टक्के, देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांचा ८.४२ टक्के हिस्सा आहे.

(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूक