Join us  

विश्वासाचं नाव TATA, 'या '२८ कंपन्यांनी गुंतवणूकदारांना केलं मालामाल; पाहा कोणत्या आहेत कंपन्या

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2022 4:24 PM

TATA Group Return : टाटा समूहाच्या कंपन्यांच्या परताव्याच्या आकड्यांवर नजर टाकली तर असे लक्षात येते की, गेल्या ३ वर्षांत टाटा समूहाच्या अनेक कंपन्यांनी गुंतवणूकदारांना मोठा परतावा दिला आहे.

मिठापासून जहाजांपर्यंत सर्वच वस्तू बनवणारा टाटा समूह केवळ भारतातच नाही तर जगभरातील एक विश्वासार्ह नाव आहे. आजच्या कठीण काळात जिथे बहुतांश परदेशी टेक कंपन्या लोकांना काढण्याच्या कामात गुंतल्या आहेत, अशा वेळी टाटांनी पुन्हा एकदा हे सिद्ध केले आहे की टाटा समूह हे एक विश्वासार्ह नाव आहे. त्यांनी नुकताच काही कंपन्यांतून काढलेल्या कर्मचाऱ्यांना नोकरी देण्याचा निर्णय घेतला आहे. ट्रस्टबद्दल बोलायचे झाले तर टाटा समूहाच्या कंपन्यांची शेअर बाजारातील कामगिरीही हाच विश्वास दाखवते. आज एक-दोन नव्हे तर टाटा समूहाच्या एकूण २८ कंपन्यांचे आकडे सांगतात की, गुंतवणूकदारांचा टाटा समूहावर कसा विश्वास आहे.

3 वर्षांचे रिटर्नटाटा समूहाच्या कंपन्यांच्या परताव्याच्या आकड्यांवर नजर टाकल्यास असे लक्षात येते की, गेल्या 3 वर्षांत टाटा समूहाच्या अनेक कंपन्यांनी गुंतवणूकदारांना मोठा परतावा दिला आहे. टाटा टेलिसर्व्हिसेसने 3 वर्षात गुंतवणूकदारांना 50, 100 नाही तर पूर्ण 3679 टक्के परतावा दिला आहे. तर टाटा इलेक्सी लिमिटेडबद्दल बोलायचे झाले तर, इथेही गुंतवणूकदारांनी 3 वर्षात 1304 टक्के इतका मोठा परतावा मिळवला आहे.

टाटाच्या प्रमुख कंपन्या टीसीएस, टायटन, टाटा कॉफी किंवा टीआरएफ असोत. प्रत्येक कंपनीने गेल्या 3 वर्षांत गुंतवणूकदारांना चांगली कमाई करून दिली आहे. टायटनने 3 वर्षांत 141 टक्के परतावा दिला आहे, तर टाटा मोटर्सने गुंतवणूकदारांना 306 टक्के नफा दिला आहे. नाल्को असो की ओरिएंट हॉटेल्स, इथेही गुंतवणूकदारांनी अवघ्या तीन वर्षांत पैसे कमावले आहेत.

टाटांवर विश्वासटाटा समूह हे एक विश्वासार्ह नाव असल्याचे बाजारातील तज्ज्ञांचे मत आहे. त्याच वेळी, त्यांची मूलभूत तत्त्वे आणि व्यवसाय करण्याच्या धोरणामुळे ते इतरांपेक्षा वेगळे आहे. ही अलीकडची गोष्ट आहे जेव्हा टाटा समूहात एअर इंडिया ताब्यात घेतल्यानंतर प्रत्येक कठीण काम करणे ही टाटांची ओळख असल्याचे दाखवून दिले आहे. स्वत: रतन टाटा म्हणतात की मी आधी निर्णय घेतो आणि नंतर दुरुस्त करतो.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :टाटाशेअर बाजारगुंतवणूक