Join us  

अब्जाधीशांचे ३५ लाख काेटी स्वाहा; मस्क व अंबानींच्या संपत्तीत माेठी घट

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2023 7:34 AM

शेअर बाजार काेसळल्याचा परिणाम; मस्क व अंबानींच्या संपत्तीत माेठी घट

लाेकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : जगभरातील अब्जाधीशांनी एकाच दिवसात तब्बल ४३ अब्ज डाॅलर म्हणजे सुमारे ३५ लाख २७ हजार काेटी रुपये गमाविले. त्यांच्या एकूण संपत्तीत माेठी घट झाली. त्यात सर्वाधिक फटका जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती इलाॅन मस्क यांना बसला. त्यांच्या संपत्तीत १८.४ अब्ज डाॅलरची घट झाली. त्या खालाेखाल रिलायन्स समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांना १० अब्ज डाॅलरचा फटका बसला.

अमेरिकेतील शेअर बाजारात गुरुवारी, तर भारतीय शेअर बाजारात शुक्रवारी माेठी पडझड झाली. त्यामुळे अब्जाधीशांच्या कंपन्यांच्या शेअर्सचे भाव घटले. मस्क यांच्या टेस्ला कंपनीचे शेअर्स घसरले. त्यामुळे त्यांना माेठा फटका बसला आहे. व्याजदर वाढल्यास त्यांना टेस्लाच्या गाड्यांच्या किंमती कमी कराव्या लागतील. टाॅप १५ अब्जाधीशांपैकी केवळ ३ जणांची संपत्ती वाढली. त्यात वाॅरेन बफे, स्टीव्ह बालमर आणि बर्नार्ड अरनाॅल्ट यांचा समावेश आहे.

मुकेश अंबानी १४व्या स्थानीn रिलायन्स उद्योग समूहाच्या समभागांनी उसळी घेतल्यामुळे समूहाचे चेअरमन मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत मोठी वाढ झाली हाेती. त्यामुळे ते जगातील टाॅप १० श्रीमंतांच्या यादीत स्थान मिळविण्याच्या उंबरठ्यावर हाेते. n मात्र, शुक्रवारी शेअर बाजार काेसळल्यामुळे त्यांच्या संपत्तीत माेठी घट झाली. परिणामी फाेर्ब्सच्या यादीत ते ११ व्या स्थानावरून १५ व्या स्थानी घसरले आहेत. n या यादीनुसार, मुकेश अंबानी यांची संपत्ती ९०.५ अब्ज डॉलर झाली आहे. अदानी समूहाचे चेअरमन गौतम अदानी हे ५१.८ अब्ज डॉलरच्या संपत्तीसह यादीत २४ स्थानी घसरले आहेत.

    श्रीमंत व त्यांची  संपत्ती    इलॉन मस्क    २३८.४    बर्नार्ड अरनॉल्ट    २३५.७    जेफ बेझोस    १५२.६    लॅरी एलिसन    १४५.८    बिल गेट्स    १२१.१     वॉरेन बफे    ११५.९      मार्क झुकेरबर्ग    १०७.२     स्टीव बालमर    १०५.६    लॅरी पेज    १०१.४    कार्लाेस स्लिम हेलू    १०१.०

गुंतवणूकदारांना दीड लाख काेटीचा फटका

सेन्सेक्स आणि निफ्टीची गटांगळी

मुंबई : शेअर बाजाराच्या गेल्या सहा दिवसांच्या तेजीला आठवड्याच्या अखेरच्या दिवशी ब्रेक लागला. सेन्सेक्स तब्बल ८८८, तर निफ्टी २३४ अंकांनी काेसळला. आयटी कंपनी इन्फाेसिसचे तिमाही निकाल अपेक्षेनुसार नसल्यामुळे बाजार काेसळला. 

शुक्रवार ठरला ब्लॅक फ्रायडे 

आयटी क्षेत्रातील कंपन्यांना या पडझडीचा माेठा फटका बसला. ‘ब्लॅक फ्रायडे’मुळे गुंतवणूकदारांना १.६१ लाख काेटी रुपयांचा फटका बसला.

टॅग्स :शेअर बाजारएलन रीव्ह मस्क