Lokmat Money >शेअर बाजार > 'या' सरकारी कंपनीच्या शेअरमध्ये तुफान तेजी, Adani Power कडून मिळालं ३५०० कोटींचं काम

'या' सरकारी कंपनीच्या शेअरमध्ये तुफान तेजी, Adani Power कडून मिळालं ३५०० कोटींचं काम

Bharat Heavy Electricals Ltd Share Price : बुधवारी मुंबई शेअर बाजारात (BSE) कंपनीचा शेअर २५५.२५ रुपयांवर बंद झाला होता. पण आता मोठी ऑर्डर मिळाल्यामुळे कंपनीच्या शेअर्समध्ये ही जोरदार वाढ झाली.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2024 10:54 AM2024-06-06T10:54:29+5:302024-06-06T10:54:47+5:30

Bharat Heavy Electricals Ltd Share Price : बुधवारी मुंबई शेअर बाजारात (BSE) कंपनीचा शेअर २५५.२५ रुपयांवर बंद झाला होता. पण आता मोठी ऑर्डर मिळाल्यामुळे कंपनीच्या शेअर्समध्ये ही जोरदार वाढ झाली.

3500 crore work received from Adani Power a boom in the shares of this state owned government Bharat Heavy Electricals Ltd | 'या' सरकारी कंपनीच्या शेअरमध्ये तुफान तेजी, Adani Power कडून मिळालं ३५०० कोटींचं काम

'या' सरकारी कंपनीच्या शेअरमध्ये तुफान तेजी, Adani Power कडून मिळालं ३५०० कोटींचं काम

Bharat Heavy Electricals Ltd Share Price : भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडच्या (भेल) शेअर्समध्ये गुरुवारी तेजी दिसून आली. कामकाजादरम्यान गुरुवारी भेलचा शेअर १३ टक्क्यांनी वधारून २८९ रुपयांवर पोहोचला. बुधवारी मुंबई शेअर बाजारात (BSE) कंपनीचा शेअर २५५.२५ रुपयांवर बंद झाला होता. मोठी ऑर्डर मिळाल्यामुळे भेलच्या शेअर्समध्ये ही जोरदार वाढ झाली. भेलला अदानी पॉवरकडून ३५०० कोटी रुपयांची ऑर्डर मिळाली आहे. भेलच्या शेअरची ५२ आठवड्यांच्या उच्चांकी पातळीवर ३२२.३५ रुपये आहे. तर, कंपनीच्या शेअर्सचा ५२ आठवड्यांचा नीचांकी स्तर ८३.१० रुपये आहे.
 

भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडनं (भेल) शेअर बाजाराला यासंदर्भातील माहिती दिली. कंपनीला अदानी पॉवर लिमिटेडकडून छत्तीसगडमधील रायपूर येथे २*८०० मेगावॅट थर्मल पॉवर प्लांट उभारण्याची ऑर्डर मिळाली आहे. ही ऑर्डर ३५०० कोटी रुपयांहून अधिक आहे. या ऑर्डरनुसार कंपनी बॉयलर, टर्बाइन, जनरेटरसह आवश्यक उपकरणांचा पुरवठा करणार आहे. सुपरक्रिटिकल तंत्रज्ञानावर आधारित वीज प्रकल्प कार्यान्वित करण्याची जबाबदारीही या कंपनीवर असेल. भेलच्या त्रिची आणि हरिद्वार प्रकल्पात बॉयलर आणि जनरेटर तयार केले जातील, असं कंपनीनं शेअर बाजाराला सांगितलं.
 

वर्षभरात शेअरमध्ये मोठी तेजी 
 

भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडच्या (भेल) शेअरमध्ये गेल्या वर्षभरात जोरदार वाढ झाली आहे. गेल्या वर्षभरात कंपनीच्या शेअरमध्ये २४५ टक्के वाढ झाली. ६ जून २०२३ रोजी भेलचा शेअर ८३.७६ रुपयांवर होता. महारत्न कंपनीचा शेअर ६ जून २०२४ रोजी २८९ रुपयांवर पोहोचला आहे. गेल्या 6 महिन्यांत भेलच्या शेअरमध्ये ६३ टक्क्यांची वाढ झाली. ६ डिसेंबर २०२३ रोजी कंपनीचा शेअर १७८.५० रुपयांवर होता, जो ६ जून २०२४ रोजी २८९ रुपयांवर पोहोचला आहे. या वर्षी आतापर्यंत भेलच्या शेअरमध्ये जवळपास ४७ टक्के वाढ झाली. या वर्षाच्या सुरुवातीला १ जून २०२४ रोजी कंपनीचा शेअर १९८.३५ रुपयांवर होता, जो आता २८९ रुपयांवर पोहोचलाय.
 

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातीत जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: 3500 crore work received from Adani Power a boom in the shares of this state owned government Bharat Heavy Electricals Ltd

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.