Join us  

शेअर बाजारात गुंतवणूकदारांचे ३८००० कोटी बुडाले, सेन्सेक १८० अंकांनी घसरला 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2023 4:32 PM

गुरुवारी प्रमुख शेअर्समध्ये झालेल्या नफावसुलीमुळे दोन्ही इंडेक्स घसरणीसह बंद झाले

Share Market Update: गुरूवारी दोन्ही निर्देशांकातील काही प्रमुख शेअर्समध्ये झालेल्या नफावसुलीमुळे दोन्ही इंडेक्स घसरणीसह बंद झाले. दरम्यान, सेन्सेक्समध्ये 180 अंकांनी घसरला. तर निफ्टी 19,400 च्या खाली बंद झाला. शुक्रवारी अमेरिकेतील सेंट्रल बँकर्सच्या बैठकीबाबतही बाजार सावध दिसत होता. त्यामुळे आज शेअर बाजारातगुंतवणूकदारांचे सुमारे 38 हजार कोटी रुपये बुडाले. मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्ये किरकोळ वाढ झाली. दुसरीकडे, क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये, आयटी, टेलिकॉम, टेक आणि सर्व्हिसेसमध्ये तेजी दिसून आली होती. दुसरीकडे एनर्जी, फार्मा, ऑटो, मेटल आणि कंझ्युमर ड्युरेबल्सचे निर्देशांक घसरणीसह बंद झाले.

कामकाजाच्या अखेरच्या सत्रात बीएसईवरील 30 शेअर्सचा निर्देशांक सेन्सेक्स 180.96 अंकांनी किंवा 0.28 टक्क्यांनी घसरून 65,252.34 वर बंद झाला. दुसरीकडे, एनएसईचा (NSE) 50 शेअर्सचा निर्देशांक निफ्टी 57.30 अंकांनी किंवा 0.29 टक्क्यांनी घसरून 19,386.70 वर बंद झाला.

गुंतवणूकदारांचे 38 हजार कोटी बुडालेबीएसईवर लिस्टेड कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल 24 ऑगस्ट रोजी 308.63 लाख कोटी रुपयांवर घसरले, जे त्याच्या आधीच्या ट्रेडिंग दिवशी म्हणजेच बुधवार, 23 ऑगस्ट रोजी 309.01 लाख कोटी रुपये होते. अशाप्रकारे बीएसईमध्ये सूचीबद्ध कंपन्यांचे मार्केट कॅप आज सुमारे 38 हजार कोटी रुपयांनी घसरले आहे. दुसऱ्या शब्दांत सांगायचं झालं तर गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे 38 हजार कोटी रुपयांची घट झाली आहे.

हे शेअर्स वाढलेसेन्सेक्समधील 30 पैकी 10 शेअर्स आज वाढीसह बंद झाले. यामध्येही इंडसइंड बँकेच्या शेअर्समध्ये सर्वाधिक 1.28 टक्के वाढ झाली. याशिवाय इन्फोसिस, अल्ट्राटेक सिमेंट, आयसीआयसीआय बँक आणि नेस्ले इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्येही वाढ दिसून आली.

या शेअर्समध्ये घसरणदुसरीकडे, सेन्सेक्समधील उर्वरित 20 शेअर्स आज घसरणीसह बंद झाले. यातही जिओ फायनान्शिअल्सच्या शेअर्समध्ये सर्वाधिक 5 टक्क्यांची घसरण झाली. यानंतर रिलायन्स इंडस्ट्रीज (RIL), पॉवर ग्रिड, JSW स्टील आणि लार्सन अँड टुब्रो (L&T) या कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण झाली.

टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूक