Lokmat Money >शेअर बाजार > ४ लाख कोटींचा चुराडा! एका अहवालामुळे अदानी कंपन्यांचे शेअर्स आपटले; गुंतवणूकदार धास्तावले

४ लाख कोटींचा चुराडा! एका अहवालामुळे अदानी कंपन्यांचे शेअर्स आपटले; गुंतवणूकदार धास्तावले

अदानी समूहाच्या कंपन्यांच्या समभागांनी विक्रमी आपटी खाल्ली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2023 06:21 AM2023-01-28T06:21:57+5:302023-01-28T06:22:08+5:30

अदानी समूहाच्या कंपन्यांच्या समभागांनी विक्रमी आपटी खाल्ली आहे.

4 lakh crore crushed Adani shares tumble on report Investors panicked | ४ लाख कोटींचा चुराडा! एका अहवालामुळे अदानी कंपन्यांचे शेअर्स आपटले; गुंतवणूकदार धास्तावले

४ लाख कोटींचा चुराडा! एका अहवालामुळे अदानी कंपन्यांचे शेअर्स आपटले; गुंतवणूकदार धास्तावले

मुंबई :

जगप्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी यांच्या अदानी समूहाने मोठी फसवणूक केल्याचा आरोप अमेरिकेतील आर्थिक संशोधन कंपनी हिंडेनबर्ग रिसर्चने केल्याने जगभरात खळबळ उडाली आहे. या आरोपानंतर अदानी समूहाच्या कंपन्यांच्या समभागांनी विक्रमी आपटी खाल्ली आहे. बुधवार आणि गुरुवार या दोन व्यापार सत्रांमध्ये कंपन्यांचे समभाग मोठ्या प्रमाणात कोसळून समूहाचे तब्बल  ४,१७,८२४.७९ लाख कोटींचा चुराडा झाला. तर दोन दिवसांत शेअर बाजारातील कंपन्यांचे भागभांडवलही १०.७३ लाख कोटी रुपयांनी कमी झाल्याने गुंतवणूकदार बुडाले आहेत.

अदानी समूहाची संपत्ती बुधवार ते शुक्रवार या ३ दिवसांमध्ये १० टक्क्यांपेक्षा कमी झाली आहे. मुंबई  शेअर बाजारानुसार. अदानी समूहाचे जवळपास तब्बल  ४,१७,८२४.७९  कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.  सर्वात जास्त नुकसान अदानी टोटल गॅसला झाले. यामुळे बँकांचे समभागही कोसळले आहेत.

अदानी समूहाने काय म्हटले? 
अदानी समूहाने म्हटले की, आमच्या प्रमुख कंपन्यांच्या शेअर्सला नुकसान पोहोचवण्यासाठी हा अहवाल तयार करण्यात आला आहे. अमेरिकन वित्तीय संशोधन कंपनी हिंडेनबर्ग रिसर्चवर “दंडात्मक कारवाई” करण्याचा कायदेशीर पर्याय आम्ही शोधत आहोत. कंपन्यांच्या कोसळत असलेल्या शेअर्सबद्दल चिंता आहे.

कोणत्या बँकांचे शेअर्स कोसळले?  
    शुक्रवारी    आठवडा        घसरण    भरातील
एसबीआय         ५%            ९%
बँक ऑफ बडोदा         ७%             १२% 
पंजाब नॅशनल बँक         ११% 
आयसीआयसी बँक         ५%       ६.३५% 

अदानी समूहाच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये किती घसरण? 
कंपनी     आजची घसरण         ५ दिवसातील       ३ वर्षांतील वाढ
अदानी ट्रान्समिशन     -२०           २६     ७२९      
अदानी पोर्ट्स     -१६.२९            -२२.४     ९८        
अदानी विल्मर      -५ सर्किट           -७.६७ सर्किट     १४९     
अदानी पॉवर       -५ सर्किट           -१०.४४ सर्किट     ३३२     
अदानी टोटल गॅस      -२०            -२४     २१२१   
अदानी ग्रीन एनर्जी      -२०            -२५     ९०८     
अदानी एंटरप्रायजेस     -१९            -१९.८३     १३९८   
अंबुजा सिमेंट      -१७.३३           -२६.२५ 
एसीसी      -१३.२०           -२०.६१
एनडीटीव्ही     -४.९९ सर्किट           -१२

हिंडेनबर्ग मात्र ठाम 
अमेरिकन आर्थिक संशोधन कंपनी हिंडेनबर्ग रिसर्चने अहवालावर ठाम असल्याचे म्हटले आहे. दोन वर्षे सतत अभ्यास करून असे आढळले की, अदानी समूह गेल्या अनेक वर्षांपासून शेअर्समध्ये गडबड आणि हिशोबात फसवणूक यात गुंतून गेला आहे.

काय आहेत गंभीर आरोप? 
रिसर्च फर्म हिंडेनबर्गने बुधवारी जारी केलेल्या अहवालात म्हटले आहे की, अदानी समूहाच्या सर्व ७ प्रमुख सूचीबद्ध कंपन्यांवर प्रमाणाबाहेर कर्ज आहे. सर्व समूह कंपन्यांचे शेअर्स ८५ टक्क्यांपेक्षा अधिक ओव्हरव्हॅल्यूड आहेत. अदानी समूहाने शेअर्समध्येही फेरफार केला. खात्यात फसवणूक केली आहे. अदानी समूह अनेक वर्षांपासून मार्केट मॅनिप्युलेशन (आपल्याला अनुकूल गोष्टी घडवून आणणे), हिशोबांमध्ये फेरफार आणि मनी लाँड्रिंगमध्ये गुंतलेला आहे.

शेअर बाजारालाही तडाखा
हिंडेनबर्ग रिसर्चचा अहवाल प्रसिद्ध केल्यानंतर बुधवारी अदानी समूहाचे समभाग ९ टक्क्यांपर्यंत कोसळले. शुक्रवारीही अदानी समूहाच्या सर्व कंपन्यांवर विक्रीचा दबाव राहिला. त्यामुळे बाजारातील गुंतवणूकदांचे १० लाख कोटी रुपये बुडाले आहेत. गेल्या तीन दिवसात बाजाराला कोट्यवधींचा फटका बसला आहे.

कुणाला किती नुकसान?
अदानी टोटल गॅस १,०४,५८०.९३ कोटी
अदानी ट्रान्समिशन ८३,२६५.९५ कोटी
अदानी ग्रीन एनर्जी ६७,९६२.९१
अदानी पोर्ट्स ३५,०४८ कोटी
अंबुजा सिमेंट २३,३११.४७ कोटी
एसीसी ८,४९०.८ कोटी
अदानी विल्मर ७,२५८ कोटी

एलआयसीचे बुडाले १८,३०० कोटी
अदानी समूहाचे नुकसान झाल्याने एलआयसीचेही मोठे नुकसान झाले आहे. एलआयसीचे तब्बल १८,३०० कोटी रुपये बुडाले आहेत. एलआयसीने अदानी समूहाच्या सात कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली आहे. अदानी समूहात सरकारी बँकांची गुंतवणूक अधिक आहे.

Web Title: 4 lakh crore crushed Adani shares tumble on report Investors panicked

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Adaniअदानी