२९ नोव्हेंबर २०२४ पासून ४५ नव्या शेअर्सवर एफ अँड ओ कॉन्ट्रॅक्ट्स सुरू करण्यात येणार आहेत. नॅशनल स्टॉक एक्स्चेंजने (एनएसई) बुधवारी, १३ नोव्हेंबर रोजी यासंदर्भातील माहिती दिली. एनएसईच्या परिपत्रकानुसार, झोमॅटो, जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस आणि एव्हेन्यू सुपरमार्ट (डीमार्ट) या काही नामांकित कंपन्या आहेत. बाजार नियामक सेबीच्या मंजुरीनंतर हे नवे कॉन्ट्रॅक्ट जोडण्याची घोषणा करण्यात आली आहे.
"सदस्यांना माहिती दिली जातेय की, ४५ अतिरिक्त सिक्युरिटीजवर F&O कॉन्ट्रॅक्ट २९ नोव्हेंबर २०२४ पासून ट्रेडिंगसाठी उपलब्ध असतील," असं एनएसईनं परिपत्रकाद्वारे म्हटलंय. पाहूया कोणत्या आहेत या ४५ नव्या सिक्युरिटीज.
यांचा F&O मध्ये होणार समावेश
या यादीत Adani Green Energy Limited, Angel One Limited, Apollo Tubes Limited, Adani Total Gas Limited, Bank of India, BSE Limited, Computer Age Management Services Limited, Central Depository Services (India) Limited, CESC Limited, CG Power and Industrial Solutions Limited, Cyient Limited, Delhivery Limited, Avenue Supermarts Limited, HFCL Limited, Housing & Urban Development Corporation Limited, Indian Bank, IRB Infrastructure Developers Limited, Indian Railway Finance Corporation Limited, Jio Financial Services Limited, Jindal Stainless Limited, JSW Energy Limited, Kalyan Jewellers India Limited, KEI Industries Limited, KPIT Technologies Limited, Life Insurance Corporation of India, Macrotech Developers Limited, Max Healthcare Institute Limited, NCC Limited, NHPC Limited, FSN E-Commerce Ventures Limited (Nykaa), Oil India Limited, One 97 Communications Limited (Paytm), PB Fintech Limited (Policybazaar), Poonawalla Fincorp Limited, Prestige Estates Projects Limited, SJVN Limited, Sona BLW Precision Forgings Limited, Supreme Industries Limited, Tata Elxsi Limited, Tube Investments of India Limited, Union Bank of India, Varun Beverages Limited, Yes Bank Limited, Zomato Limited यांचा समावेश करण्यात आला आहे.
(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)