Share Market : तुमच्यापैकी अनेकजण शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवत असतील. पण, जगातील सर्वात महाग शेअर कोणता, हे तुम्हाला माहितेय का? भारतीय शेअर मार्केटमध्ये 5-10 पैशांचे अनेक शेअर्स उपलब्ध आहेत. कोणीही हे शेअर खरेदी करू शकतो. पण जगातील सर्वात महागड्या शेअरची किंमत ऐकून तुमचा विश्वास बसणार नाही.
हा आहे महागडा शेअरजगातील सर्वात महाग स्टॉक बर्कशायर हॅथवे इंकचा आहे. सध्या या कंपनीच्या एका शेअरची किंमत 5,43,750 डॉलर (USD) आहे, जी भारतीय चलनात (रु. 4.52 कोटी) इतकी आहे. या एका शेअरद्वारे तुम्ही आलिशान घर, कार, सर्व सुखसोयी उपभोगू शकता. बर्कशायर हॅथवे इंकच्या शेअरने गेल्या एका वर्षात 18 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. तर पाच वर्षांत या शेअरने गुंतवणूकदारांना सुमारे 80 टक्के परतावा दिला आहे.
एका शेअरनेही करोडपतीया कंपनीचा एक शेअर एखाद्या व्यक्तीचे जीवन बदलू शकतो. पण, सामान्य माणसाने आपल्या संपूर्ण आयुष्यातील कमाई एकवटली, तरी तो बर्कशायर हॅथवे इंकचा एक शेअर खरेदी करू शकणार नाही. हा शेअर खरेदी करण्यासाठी किमान 4.52 कोटी रुपये लागतील, जे सर्वसामान्यांच्या बजेटच्या बाहेर आहे. बर्कशायर हॅथवेचा स्टॉक आजपासून नव्हे, तर गेल्या अनेक वर्षांपासून जगातील सर्वात महागडा स्टॉक राहिला आहे.
वॉरन बफे कंपनीचे मालक जगातील दिग्गज गुंतवणूकदार वॉरन बफे बर्कशायर हॅथवे इंकचे प्रमुख आहेत. कंपनीचा बहुतांश व्यवसाय अमेरिकेत आहे. कंपनीत सुमारे 3,83,000 कर्मचारी काम करतात. बर्कशायर हॅथवे इंक. अमेरिकेशिवाय चीनमध्येही विस्तार करण्याची योजना आहे. 1965 मध्ये जेव्हा वॉरन बफेट यांनी या कापड कंपनीची सूत्रे हाती घेतली, तेव्हा एका शेअरची किंमत $20 पेक्षा कमी होती. बर्कशायर हॅथवेचा व्यवसाय मालमत्ता, विमा, ऊर्जा, मालवाहतू, किरकोळ विक्री आणि सेवा क्षेत्रांमध्ये आहे. त्याचे मुख्यालय ओमाहा येथे आहे. याची सुरुवात 1939 मध्ये झाली होती. बफे यांनी 1965 मध्ये बर्कशायर हॅथवे विकत घेतली.
(टीप: शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.)