Join us

३७ वर्षांत ४६ हजार कोटींचे साम्राज्य; दिग्गज गुंतवणूकदार म्हणून झुनझुनवाला यांनी निर्माण केली प्रतिमा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2022 5:48 AM

Rakesh Jhunjhunwala : भारतीय शेअर बाजार नेहमीच धोक्याने वेढलेला असतो. येथे जास्त कमाई करणाऱ्या लोकांची नावे अनेकदा घोटाळ्यांशी जोडली गेली आहेत, ज्यामुळे गुंतवणूकदारांच्या मनात नेहमीच एक प्रकारची शंका निर्माण झाली आहे.

मुंबई : शेअर बाजाराचे दिग्गज गुंतवणूकदार आणि ‘बिग बुल’, ‘वॉरेन बफे ऑफ इंडिया’ म्हणून ओळखले जाणारे  राकेश झुनझुनवाला यांचे रविवारी निधन झाले. त्यांची एकूण संपत्ती ४६ हजार कोटी रुपये होती. दूरदृष्टी ठेवत घोटाळ्यांपासून दूर राहून झुनझुनवाला शेअर बाजाराचे बिग बुल झाले होते.भारतीय शेअर बाजार नेहमीच धोक्याने वेढलेला असतो. येथे जास्त कमाई करणाऱ्या लोकांची नावे अनेकदा घोटाळ्यांशी जोडली गेली आहेत, ज्यामुळे गुंतवणूकदारांच्या मनात नेहमीच एक प्रकारची शंका निर्माण झाली आहे. मात्र राकेश झुनझुनवाला यांनी त्यांच्या पद्धतीने ही प्रतिमा बदलली आणि ते सुमारे ४६ हजार कोटी रुपयांची मालमत्ता जमवत भारतातील सर्वांत मोठे वैयक्तिक गुंतवणूकदार बनले. 

कसे करत शेअरची निवड? - झुनझुनवाला यांचे वेगळेपण म्हणजे ते अतिशय अभ्यास करून शेअरची निवड करत.- टायटन आणि इंडियन हॉटेल्स कंपनी यांसारख्या समभागांवरील त्याच्या विचारपूर्वक केलेल्या अभ्यासाने त्यांना भारतीय बाजारपेठेत मोठे नाव मिळवून दिले. परिस्थिती अशी बनली की झुनझुनवालांच्या पोर्टफोलिओमध्ये समाविष्ट असलेल्या समभागांबाबत गुंतवणूकदार लक्ष ठेवू लागले.- झुनझुनवाला यांनी पायाभूत सुविधा क्षेत्रांत केलेली काही गुंतवणूक फारशी प्रभावी ठरली नाही. मात्र त्याची भरपाई ते इतर समभागांतून करत असत. कंपन्यांकडून अपेक्षेप्रमाणे कामगिरी न झाल्यास गुंतवणूकदार म्हणून कठोर भूमिका घेत असत.

अनेकदा घेतला गेला संशयमोठ्या घटनांपूर्वी शेअर्सच्या खरेदी-विक्रीबाबतची त्यांची भूमिका वादाच्या भोवऱ्यात होती. गेल्या वर्षीच, त्यांनी ३७ कोटी रुपये देण्याचे कबूल करून ॲपटेकच्या व्यापाराचे प्रकरण निकाली काढले.२०२१ मध्ये सोनी पिक्चर्ससोबत खरेदीचा निर्णय घेण्यापूर्वी झी एंटरप्रायझेसच्या शेअर्समध्ये मोठी गुंतवणूक करून अल्पावधीत ७० कोटींचा नफा कमावण्याबाबतही अनेक शंका उपस्थित केल्या जातात. 

स्टार हेल्थटायटनरॅलिस इंडियाकॅनरा बँकइंडिया हॉटेल्स कंपनीॲग्रो टेक फूड्सनजारा टेक्नॉलॉजीटाटा मोटर्स(तीन डझनपेक्षा अधिक कंपन्यांमध्ये त्यांनी गुंतवणूक केली होती.)

५ हजार रुपये ते ४६ हजार कोटी...महाविद्यालयात असताना त्यांनी भारतीय शेअर बाजारात फक्त पाच हजार रुपयांच्या भांडवलाने गुंतवणूक करण्यास सुरुवात केली होती. झुनझुनवाला यांनी  १९८६ मध्ये टाटा टीचे ५ हजार समभाग ४३ रुपयांच्या भावाने विकत घेतले होते.तीन महिन्यांत हे समभाग १४३ रुपयांवर पोहोचले. हा सर्वात मोठा नफा होता. त्यांनी ३ वर्षांत २० ते २५ लाखांची कमाई केली होती.झुनझुनवाला यांनी शेअर बाजारात गुंतवणूक करण्यास सुरुवात केली तेव्हा निर्देशांक १५० अंकांवर होता. आज सेन्सेक्स ५९,००० अंकांच्या पातळीवर आहे.

टॅग्स :राकेश झुनझुनवाला