स्मॉलकॅप कंपनीने महिनाभरातच आपल्या गुंतवणूकदारांना छप्परफाड परतावा दिला आहे. या कंपनीचे नाव आहे, पीएनजीएस गार्गी फॅशन ज्वैलरी (PNGS Gargi Fashion Jewellery). या ज्वैलरी कंपनीच्या शेअर्सची लिस्टिंग गेल्या महिन्यात 20 डिसेंबरला झाली होती. हिची आयपीओ प्राईस 30 रुपये होती. इश्यू प्राइसच्या तुलनेत हा शेअर आतापर्यंत तब्बल 506% नी वधारला आहे. महत्वाचे म्हणजे कंपनीच्या शेअरमध्ये सातत्याने अप्पर सर्किट लागत आहे. आज मंगळवारीही हा शेअर 5% च्या अप्पर सर्किटमध्ये आहे. याची शेअर प्राईस 181.80 रुपये एवढी आहे.
डिसेंबर 2022 मध्ये आला होता IPO -
पीएनजीएस गार्गी फॅशन ज्वैलरीचा आयपीओ डिसेंबर महिन्यात आला होता. तो 30 रुपयांवर अॅलॉट झाला होता. कंपनीचे शेअर 20 डिसेंबरला लिस्ट झाले होते. लिस्टिंगच्या दिवशी कंपनीचा शेअर 106 टक्क्यांच्या तेजीसह 59.85 रुपयांवर पोहोचला होता. लिस्टिंगपासून कंपनीचा शेअर सातत्याने अप्पर सर्किटवर आहे.
गुंतवणूकदारांचा छप्परफाड फायदा -
कंपनीचा आयपीओ 8 डिसेंबर 2022 रोजी सब्सक्रिप्शनसाठी ओपन झाला होता आणि 13 डिसेंबरपर्यंत खुला होता. रिटेल इनव्हेस्टर्स IPO मध्ये एका लॉटसाठी अप्लाई करू शकत होते. कंपनीच्या आयपीओमध्ये एका लॉटमध्ये 4000 शेअर होते. अर्थात, इंव्हेस्टर्सना IPO मध्ये 1.20 लाख रुपयांची इंव्हेस्टमेंट करावी लागली. हाच पैसा आज वाढून 7.27 लाख रुपये झाला असेल.
(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)