Join us  

Trading App द्वारे महिलेची तब्बल 53 लाखांची फसवणूक; ट्रॅप असा की संशयाला जागा नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2024 8:45 AM

Trading App Scam : बनावट ट्रेडिंग अ‍ॅप्समध्ये अडकून लोकांची फसवणूक करण्याच्या घटना झपाट्याने वाढत आहेत. अलीकडेच फसवणूक करणाऱ्यांनी दिल्लीतील एका महिलेला बनावट ट्रेडिंग अ‍ॅपद्वारे आपला बळी बनवले आहे.

Trading App Scam : कोरोनानंतर लावलेल्या लॉकडाउन काळात शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याचे प्रमाण वाढत आहे. शेअर बाजारातगुंतवणूक आणि ट्रेडिंग करण्यासाठी अनेक मोबाईल अ‍ॅप्स उपलब्ध आहेत. या परिस्थितीचा फायदा घेत सायबर भामट्यांनी अनेकांना आपल्या ट्रॅपमध्ये अडकवत आहेत. बनावट ट्रेडिंग अ‍ॅप्सद्वारे लोकांची फसवणूक करण्याच्या घटना झपाट्याने वाढत आहेत. अशीच एक घटना राजधानी दिल्लीतून समोर आली आहे. ट्रेडिंग अ‍ॅपमध्ये पैसे गुंतवून एका महिलेची 53 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. तुम्ही जर ट्रेडिंग करत असाल तर सायबर भामट्यांचा ट्रॅप समजून घेणे महत्त्वाचे आहे.

जास्त नफ्याचे आमिषलोकांचा विश्वास संपादन करण्यासाठी गुन्हेगार सुरुवातीला काही पैसे जमा केल्यानंतर अ‍ॅपवर बनावट नफा दाखवतात. जेणेकरून लोकांनी अधिक गुंतवणूक करावी. त्यानंतर आयपीओमध्ये गुंतवणूक करून नफा कमावण्याचे आमिष दाखवून लोकांना अधिक पैसे गुंतवण्याठी भाग पाडले जाते. अनेकजण या आमिषाला बळी पडून पैसे गमावून बसतात. बनावट अ‍ॅपवरुन पैसे काढण्याचे प्रयत्न करताच त्यांची अ‍ॅक्टिव्हिटी ब्लॉक केली जात. या मोबदल्यात पीडितांना अ‍ॅप लोन, टॅक्स आणि इतर अनेक खात्यांमध्ये अधिक पैसे ट्रान्सफर करण्याची मागणी करण्यात येते. या गोष्टीस वापरकर्त्याने नकार दिल्यास अ‍ॅपवरील त्यांची अ‍ॅक्टिव्हिटी केली जात.

दिल्लीच्या महिलेसोबत काय झालं?शेअर मार्केटमधून अधिक नफा कमावण्याच्या उद्देशाने महिला ट्रेडिंग अ‍ॅप शोधत होती. अशात ती बनावट ट्रेडिंग अ‍ॅपच्या जाळ्यात अडकली. पीडित महिलेने सांगितले, की गुन्हेगारांच्या काही कथित मित्रांनी मला संपर्क करुन पैसे उधार देण्याची ऑफर दिली. हे लोक वैयक्तिक खाती बायपास करून आणि व्यवहाराचा कोणताही पुरावा न देता पीडितेच्या खात्यातून आंतरराष्ट्रीय खात्यात पैसे ट्रान्सफर करत होते. याचा अर्थ हा संपूर्ण स्कॅम देशाबाहेरुन ऑपरेट करत असल्याची शक्यता आहे. या प्रकारात दिल्लीच्या या पीडित महिलेने तब्बल ५३ लाख रुपये गमावले आहे.

काय काळजी घ्याल?तुम्हाला शेअर बाराजात गुंतवणूक किंवा ट्रेडिंग करण्याची इच्छा असेल तर अधिक वेबसाईट किंवा खात्री केल्याशिवाय कुठलेही अ‍ॅप डाउनलोड करू नका. अनेकदा सायबर गुन्हेगार टेक्स्ट मॅसेज किंवा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून अशा अ‍ॅप्सच्या लिंक पाठवत असतात. त्यामुळे कुठल्याही अनोळखी अ‍ॅप्स डाउनलोड करण्याआधी खात्री करा. थेट गुगल किंवा कुठल्याही सर्च इंजिनवर जाऊन अ‍ॅप डाउनलोड करू नये.  

टॅग्स :शेअर बाजारशेअर बाजारपैसागुंतवणूक