Lokmat Money >शेअर बाजार > दिग्गज गुंतवणूकदारानं खरेदी केले या कंपनीचे 55 लाख शेअर; 2500 टक्क्यांचा दिलाय परतावा

दिग्गज गुंतवणूकदारानं खरेदी केले या कंपनीचे 55 लाख शेअर; 2500 टक्क्यांचा दिलाय परतावा

मधू केला यांनी या मल्टीबॅगर स्टॉकमध्ये ₹66,93,73,320 रुपयांची गुंतवणूक केली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2023 07:13 PM2023-09-12T19:13:14+5:302023-09-12T19:13:31+5:30

मधू केला यांनी या मल्टीबॅगर स्टॉकमध्ये ₹66,93,73,320 रुपयांची गुंतवणूक केली आहे.

55 lakh shares of this company bought by a legendary investor madhu kela stock increased by 2500 percent | दिग्गज गुंतवणूकदारानं खरेदी केले या कंपनीचे 55 लाख शेअर; 2500 टक्क्यांचा दिलाय परतावा

दिग्गज गुंतवणूकदारानं खरेदी केले या कंपनीचे 55 लाख शेअर; 2500 टक्क्यांचा दिलाय परतावा

प्रसिद्ध गुंतवणूकदार मधू केला यांनी मल्टीबॅगर स्टॉक ट्रान्सफॉर्मर्स अँड रेक्टिफायर्स (इंडिया) लिमिटेडमध्ये 3.91 टक्क्यांची नवी गुंतवणूक केली आहे.  एक्सचेन्ज फायलिंगनुसार, मधू केला यांना शेअर अॅलॉट कमिटीकडून कंपनीचे 55,78,111 शेयर अॅलॉट करण्यात आले आहेत. ₹1,20,00,01,320 एवढा फंड जमवण्यासाठी कंपनीने जारी केलेले  1,000001 प्रेफरन्स शेअर्सपैकी हे शेअर  अॅलॉट करण्यात आले. अर्थात मधू केला यांनी या मल्टीबॅगर स्टॉकमध्ये ₹66,93,73,320 रुपयांची गुंतवणूक केली आहे. कंपनीचा शेअर मंगळवारी जवळपास 8 टक्क्यांनी घसरून 141.50 रुपयांवर बंद झाला.

Madhu Kela शेअरहोल्डिंग -
एक्सचेन्ज संचारनुसार, मधू केला यांना 55,78,111 कंपनी शेअर अॅलॉट करण्यात आले आहेत. जे कंपनीच्या एकूण पेड-अप भांडवलाच्या 3.91 टक्के आहे. त्यांनी हे शेअर कंपनीकडून नवा फंड उभारण्यासाठी सादर केले आहेत. त्यांना हे शेअर कंपनीने नवा फंड उभारण्यासाठी ऑफर केलेल्या 1000001 प्राधान्य शेअर्सपैकी मिळाले आहेत. कारण हे शेअर ₹120 प्रति शेअर प्रमाणे सादर करण्यात आले होते. मधू केला यांनी या कंपनीत एकूण ₹66,93,73,320 गुंतवणूक केली आहे.

कंपनीची शेअर प्राइस -
या मल्टीबॅगर स्टॉकने कोरोनानंतर रिबाउंडमध्ये आपल्या शेअरधारकांना जबरदस्त परताना दिला आहे. ट्रान्सफॉर्मर्स अँड रेक्टिफायर्स (इंडिया) शेअर प्राइसच्या हिस्ट्रीनुसार, हा स्मॉल-कॅप जवळपास ₹5.50 प्रति शेअरवर पोहोचला आणि तेव्हापासूनच हा शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी डाउनट्रेंडसाठी एक आदर्श शेअर बनला आहे. गेल्या तीन वर्षांत हा स्टॉक जवळपास ₹5.50 रुपयांवरून ₹145 रुपयांपर्यंत पोहोचला आहे. या काळात या शेअरने जवळपास 2,500 टक्क्यांपर्यंतचा परतावा दिला आहे. गेल्या एका वर्षात या मल्टिबॅगर स्टॉकने 250 टक्क्यांहून अधिकचा परतावा दिला आहे. तर YTD काळात, या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 150 टक्क्यांहून अधिकचा परतावा दिला आहे.

(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)
 

Web Title: 55 lakh shares of this company bought by a legendary investor madhu kela stock increased by 2500 percent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.