Lokmat Money >शेअर बाजार > ५.७८ लाख कोटी रुपये बुडाले, शेअर बाजाराला हुडहुडी 

५.७८ लाख कोटी रुपये बुडाले, शेअर बाजाराला हुडहुडी 

शुक्रवारी मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ४६१.२२ अंकांनी घसरून ६१,३३७.८१ अंकांवर बंद झाला. गुरुवारी सेन्सेक्स ८७८.८८ अंकांनी घसरला होता.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2022 06:26 AM2022-12-17T06:26:39+5:302022-12-17T06:26:55+5:30

शुक्रवारी मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ४६१.२२ अंकांनी घसरून ६१,३३७.८१ अंकांवर बंद झाला. गुरुवारी सेन्सेक्स ८७८.८८ अंकांनी घसरला होता.

5.78 lakh crore rupees lost, the stock market fell | ५.७८ लाख कोटी रुपये बुडाले, शेअर बाजाराला हुडहुडी 

५.७८ लाख कोटी रुपये बुडाले, शेअर बाजाराला हुडहुडी 

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : देश थंडीने गारठला असतानाच शुक्रवारी शेअर बाजारानाही मोठ्या घसरगुंडीमुळे हुडहुडी भरली. जगातील अनेक केंद्रीय बँकांनी धोरणात्मक व्याजदरात वाढ केल्यामुळे निराश झालेल्या शेअर बाजारांत सलग दोन दिवसांत मोठी पडझड झाली. त्यामुळे गुंतवणूकदारांचे तब्बल ५.७८ लाख कोटी रुपये बुडाले.

शुक्रवारी मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ४६१.२२ अंकांनी घसरून ६१,३३७.८१ अंकांवर बंद झाला. गुरुवारी सेन्सेक्स ८७८.८८ अंकांनी घसरला होता. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी शुक्रवारी १४५.९० अंकांनी घसरून १८,२६९ अंकांवर बंद झाला. दोन दिवसांत सेन्सेक्स १,३४०.१ अंकांनी घसरला. पडझडीने सेन्सेक्समध्ये सूचीबद्ध असलेल्या कंपन्यांचे बाजारमूल्य ५,७८,६४८.३९ कोटी रुपयांवरून २,८५,४६,३५९.०६ कोटी रुपयांवर घसरले. 

जीएसटी परिषदेची आज बैठक
nजीएसटी परिषदेची शनिवारी ४८ वी महत्त्वपूर्ण बैठक अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या अध्यक्षतेखाली हाेणार आहे. त्यात अपीलीय न्यायाधिकरणांची स्थापना, पानमसाला व गुटखा व्यवसायांमध्ये कर चाेरी राेखण्याची यंत्रणा उभारणे, जीएसटी कायद्यांमधील अनियमिता गुन्हेगारी श्रेणीतून बाहेर काढण्याबाबत चर्चा हाेण्याची शक्यता आहे. 
nयाशिवाय ऑनलाईन गेमिंग आणि कसिनाेबाबतही चर्चा हाेऊ शकते. यावर २८ टक्के जीएसटी लावण्यावर गेल्या बैठकीत सहमती झाली हाेती.

Web Title: 5.78 lakh crore rupees lost, the stock market fell

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.