Sensex-Nifty opens green: जागतिक बाजारातील दमदार संकेतांमुळे देशांतर्गत बाजार तेजी दिसून येत आहे. अपेक्षेपेक्षा चांगला रिटेल सेल्स आणि बेरोजगारी भत्त्याच्या आकडेवारीमुळे अमेरिकेच्या निर्देशांकात जोरदार तेजी आली आणि यामुळे जगभरातील बाजारांना मोठा आधार मिळाला.
देशांतर्गत बाजाराबद्दल बोलायचं झालं तर सेन्सेक्स आणि निफ्टीनं अर्ध्या टक्क्यांहून अधिक उसळी घेतली. निफ्टी क्षेत्रातील सर्व निर्देशांक ग्रीन झोनमध्ये असून ऑटो, आयटी, मेटल, मीडिया आणि ऑईल अँड गॅस निफ्टी निर्देशांक १-१ टक्क्यांपेक्षा अधिक वधारले आहे. मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्येही चांगली खरेदी दिसून आहे.
एकंदरीत बीएसईवर लिस्टेड कंपन्यांचं मार्केट कॅप ३.६७ लाख कोटी रुपयांनी वाढलं आहे, म्हणजेच बाजार उघडताच गुंतवणूकदारांच्या संपत्तीत ३.६७ लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे. आता इक्विटी बेंचमार्क निर्देशांकांबद्दल बोलायचं झालं तर बीएसई सेन्सेक्स कामकाजादरम्यान ५९३.६७ अंकांनी म्हणजेच ०.७५ टक्क्यांनी वधारून ७९,६९९.५५ वर आणि निफ्टी ५० १७२.३० अंकांनी म्हणजे ०.७१ टक्क्यांनी वधारून २४,३१६.०५ वर होता. यापूर्वी सेन्सेक्स ७९,१०५.८८ वर तर निफ्टी २४,१४३.७५ वर बंद झाला होता.
या शेअर्समध्ये सर्वाधिक तेजी / घसरण
सेन्सेक्समध्ये ३० शेअर्स लिस्टेड असून त्यापैकी २८ शेअर्स ग्रीन झोनमध्ये आहेत. महिंद्रा अँड महिंद्रा आणि टाटा स्टील या कंपन्यांच्या शेअर्समध्ये सर्वाधिक तेजी दिसून आली. तर दुसरीकडे, पॉवरग्रिड आणि एचयूएल मध्ये सर्वाधिक घसरण झाली. याशिवाय महिंद्रा अँड महिंद्रा, टीसीएस, टेक महिंद्रा, एचसीएल टेक, टाटा मोटर्स, भारती एअरटेल, कोटक महिंद्रा बँक, जेएसडब्ल्यू स्टी, एनटीपीसी, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी यांच्या शेअर्समध्येही तेजी दिसून आली.