Join us  

टाटांच्या कंपनीला ६२,१४८ कोटींचा फायदा, SBI ला मोठं नुकसान; पाहा रिलायन्सची काय स्थिती

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2023 9:42 AM

देशातील टॉप-१० मूल्यवान कंपन्यांपैकी ७ कंपन्यांचं एकूण बाजारमूल्य गेल्या आठवड्यात १,५०,६७९.२८ कोटी रुपयांनी वाढलं.

देशातील टॉप-१० मूल्यवान कंपन्यांपैकी ७ कंपन्यांचं एकूण बाजारमूल्य गेल्या आठवड्यात १,५०,६७९.२८ कोटी रुपयांनी वाढलं. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) आणि इन्फोसिस या आयटी कंपन्यांना बाजारातील आशावादी ट्रेंडचा सर्वाधिक फायदा झाला. गेल्या आठवड्यात बीएसईच्या संवेदनशील निर्देशांक सेन्सेक्समध्ये ८९०.०५ अंकांची किंवा १.३७ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली. 

रिलायन्स इंडस्ट्रीज, टीसीएस, एचडीएफसी बँक, इन्फोसिस, हिंदुस्थान युनिलिव्हर, आयटीसी आणि भारती एअरटेल यांना या रॅलीचा फायदा झाला. दुसरीकडे, आयसीआयसीआय बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया आणि बजाज फायनान्स या टॉप-१० कंपन्यांमध्ये समाविष्ट असलेल्या कंपन्यांच्या बाजारमूल्यात मात्र घसरण झाली.टीसीएसला सर्वाधिक फायदागेल्या आठवड्यात टीसीएसचं मूल्यांकन ६२,१४८.९९ कोटी रुपयांनी वाढून १२,८१,६३७.६३ कोटी रुपये झालं. अशा प्रकारे, टीसीएसच्या मूल्यांकनात सर्वाधिक वाढ नोंदवली गेली. या कालावधीत इन्फोसिसचं बाजार भांडवल २८,६१६.९८ कोटी रुपयांनी वाढून ५,९६,६८१.७५ कोटी रुपये झालं.

रिलायन्सला २८,१११ कोटींचा फायदादेशातील आघाडीची कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजचं बाजारमूल्य २८,१११.४१ कोटी रुपयांनी वाढून १५,९३,८९३.०३ कोटी रुपये झालं. तर एचडीएफसी बँकेचं बाजारमूल्य ११,१३६.६१ कोटी रुपयांनी वाढून ११,४२,२१५.८१ कोटी रुपयांवर पोहोचलं आहे. हिंदुस्तान युनिलिव्हरचं बाजारमूल्य १०,०३२.७५ कोटी रुपयांनी वाढून ५,९४,३१७.३६ कोटी रुपये आणि भारती एअरटेलचं बाजारमूल्य ६,८२८.७४ कोटी रुपयांनी वाढून ५,३२,५८५.६३ कोटी रुपये झालं. आयटीसीनंही या कालावधीत ३,८०३.८ कोटी जोडले आणि तिचे मूल्यांकन ५,४७,८०८.४३ कोटी रुपये झालं.

एसबीआयला १४,५०२ कोटींचं नुकसानसार्वजनिक क्षेत्रातील स्टेट बँक ऑफ इंडियाचं मूल्यांकन १४,५०२.५ कोटी रुपयांनी घसरून ५,०२,५८९.५२ कोटी रुपये झालं. या कालावधीत, आयसीआयसीआय बँकेचं बाजारमूल्य ११,३०८.९७ कोटी रुपयांनी घसरून ६,४६,२५४.४१ कोटी रुपयांवर आलं. बजाज फायनान्सचे बाजारमूल्यही ४,९७३.६८ कोटी रुपयांनी घसरून ४,४६,१६९.४० कोटी रुपयांवर आलं. यासह, रिलायन्स इंडस्ट्रीजनं देशातील सर्वात मौल्यवान कंपनीचा किताब कायम राखला आहे. त्यानंतर टीसीएस, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, इन्फोसिस, हिंदुस्थान युनिलिव्हर, आयटीसी, भारती एअरटेल, स्टेट बँक ऑफ इंडिया आणि बजाज फायनान्स यांचा क्रमांक लागतो.

टॅग्स :शेअर बाजारटाटाएसबीआयरिलायन्स