लाेकमत न्यूज नेटवर्कमुंबई : भारतीय शेअर बाजाराने सलग सातव्या दिवशी तेजी कायम राखत पुन्हा एकदा ऐतिहासिक उच्चांकी मजल मारली. मुंबई शेअर बाजाराचानिर्देशांक सेन्सेक्स प्रथमच ६३ हजारांवर पाेहाेचला. सेन्सेक्स ४१७.८१ अंकांनी वधारून ६३,०९९.६५ वर बंद झाला. तर निफ्टीही १४०.३० अंकांनी वधारून १८,७५८.३५ वर बंद झाला.
बुधवारी शेअर बाजार उघडल्यानंतर दुपारपर्यंत फार तेजी नव्हती. परंतु, दुपारी दाेननंतरच्या सत्रात बाजारात माेठी तेजी आली. सेन्सेक्सने ६३,३०३ ही इंट्रा डे उच्चांकी पातळी गाठली. तर निफ्टीनेही इंट्रा डेदरम्यान प्रथमच १८,८०० ही पातळी गाठली आणि १८,८१६ अंकांचा उच्चांक गाठला हाेता. आता शेअर बाजाराच्या नजरा अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हचे प्रमुख जेराेम पाॅवेल यांच्या घाेषणेकडे लागल्या आहेत. व्याजदरवाढीबाबत त्यांनी नरमाईची भूमिका घेतल्यास बाजारात आणखी तेजी दिसू शकते.
५२ हजारांच्या खाली गेला हाेता सेन्सेक्सn १४ महिन्यांच्या कालावधीत सेन्सेक्सने ६० हजारांवरून ६३ हजारांपर्यंतचा टप्पा गाठला आहे. n यावर्षी सुरुवातीला युक्रेन युद्धाच्या प्रभावामुळे सेन्सेक्समध्ये घसरण झाली हाेती. n जून महिन्यात जवळपास ५१,३६० या पातळीपर्यंत सेन्सेक्स घसरला हाेता. त्यानंतर त्यात सातत्याने तेजी दिसत आहे.या क्षेत्रांमध्ये तेजीn शेअर बाजारात बुधवारी ऑटाे, एफएमसीजी, मेटल्स आणि बांधकाम क्षेत्रात मजबुती दिसली. n या क्षेत्रांमध्ये १.५ टक्क्यांहून अधिक तेजी हाेती. सेन्सेक्सच्या ३० पैकी २६ कंपन्यांचे शेअर्स वधारले.
तेजी कशामुळे?n भारतीय शेअर बाजारात परकीय संस्थात्मक गुंतवणूकदारांनी माेठ्या प्रमाणात खरेदी केली. बुधवारी शेवटच्या सत्रात त्यामुळेच शेअर बाजाराने उत्तुंग झेप घेतली. n याशिवाय युराेपियन बाजारातही तेजी दिसून आली. तसेच दुसऱ्या तिमाहीतील जीडीपीची आकडेवारी अपेक्षेनुसार असण्याच्या अंदाजामुळे गुंतवणूकदार भारताकडे आकर्षित झाले आहेत.
परकीय संस्थात्मक गुंतवणूकदारांनी मंगळवारी १,२४१ काेटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले हाेते. बुधवारी हा आकडा यापेक्षा जास्त हाेता. सलग सातव्या दिवशी तेजी आहे. येणाऱ्या काही दिवसांमध्ये नफेखाेरी दिसू शकते. निफ्टी १८,६५०पर्यंतची पातळी कायम राखू शकताे.
रुपयाही वधारलारुपयामध्येही तेजी दिसून आली. परकीय चलन बाजारात रुपया ३४ पैशांनी वधारून डाॅलरच्या तुलनेत ८१.३८ रुपये प्रति डाॅलरवर बंद झाला.
१९८६ १००जुलै १९९० १०००ऑक्टाे. १९९९ ५०००फेब्रु. २००६ १००००डिसेंबर ०७ २००००एप्रिल २०१७ ३००००जून २०१९ ४००००फेब्रु.२०२१ ५००००सप्टेंबर २०२१ ६००००३० नाेव्हें. २२ ६३,०९९