Join us  

पैसे तयार ठेवा! या आठवड्यात येणार ₹2000 कोटींचे 8 IPO, 11 नवीन शेअर्सची लिस्टिंग होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2024 3:56 PM

या आठवड्यात बहुप्रतिक्षित Ola इलेक्ट्रिकचा IPO येण्याची अपेक्षा आहे.

IPOs This Week : शेअर बाजारातगुंतवणूक करणाऱ्यांसाठी, विशेषतः नवीन IPO च्या शोधात असणाऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी आहे. येत्या आठवड्यात देशांतर्गत शेअर बाजारात अनेक IPO दाखल होणार आहेत. IPO कॅलेंडरनुसार, येत्या 5 दिवसांत किमान 8 कंपन्या IPO लॉन्च करणार आहेत. त्यांच्या व्यतिरिक्त या आठवडाभरात 11 नवीन कंपन्या शेअर बाजारात लिस्ट होणार आहेत.

हा मोठा IPO मेनबोर्डवर येणार सुमारे दोन आठवड्यांच्या विलंबानंतर या आठवड्यात मेनबोर्डवर IPO सुरू होणार आहे. दिल्लीस्थित फार्मास्युटिकल कंपनी Acums Drugs and Pharmaceuticals चा Rs 1,857 कोटी IPO 30 जुलै रोजी उघडणार आहे, तर 1 ऑगस्ट रोजी हा IPO बंद होईल. या IPO मध्ये कंपनीने 646 रुपये ते 679 रुपयांचा प्राइस बँड निश्चित केला आहे.

हे 5 SME IPO दुसऱ्या दिवशी उघडतील30 जुलै रोजी SME विभागामध्ये पाच IPO लॉन्च होत आहेत. मंगळवारी उघडणारे पाचही SME IPO 1 ऑगस्टपर्यंत सबस्क्रिप्शनसाठी उपलब्ध असतील. त्यापैकी प्रमुख म्हणजे, सथलोखर सिनर्जी आयपीओ 93 कोटी रुपयांचा आणि आशापुरा लॉजिस्टिक आयपीओ 52.66 कोटी रुपयांचा आहे. त्यांच्याशिवाय बल्ककॉर्प इंटरनॅशनल, किझी अपेरल्स आणि राजपुताना इंडस्ट्रीजचे आयपीओही मंगळवारी उघडत आहेत.

Ola इलेक्ट्रिक आयपीओ येऊ शकतोया आठवड्यात आणखी दोन SME IPO सुरू होत आहेत. त्यात 31 जुलै रोजी येणारा उत्सव गोल्ड IPO आणि 1 ऑगस्ट रोजी धारिवाल कॉर्प IPO यांचा समावेश आहे. Ola इलेक्ट्रिक मोबिलिटीचा बहुप्रतिक्षित IPO आठवड्याच्या शेवटच्या दिवशी, म्हणजे 2 ऑगस्टला उघडू शकतो. या IPO बद्दल अजून कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

हे शेअर लिस्ट होणारया आठवड्यात लिस्टेड शेअर्सची यादी मोठी होणार आहे. RNFI सर्व्हिसेस लिमिटेड, SAR टेलिव्हेंचरची लिस्टिंग 29 जुलै रोजी होणार आहे. तर, 30 जुलै रोजी VVIP इन्फ्राटेक आणि VL इन्फ्राप्रोजेक्ट्स, 31 जुलै रोजी मंगलम इन्फ्रा अँड इंजिनीअरिंग आणि चेतना एज्युकेशन, 1 ऑगस्ट रोजी रोजी ट्रोम इंडस्ट्रीज, अप्रमेया इंजिनीअरिंग आणि क्लिनीटेक लॅब, 2 ऑगस्ट रोजी एस्प्रिट स्टोन्स आणि एसए टेक सॉफ्टवेअर इंडियाच्या शेअरची लिस्टिंग होईल.

(टीप- शेअर मार्केटमधील गुंतवणूक जोखमीच्या अधीन आहे. कुठल्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी आर्थिक सल्लागाराची मदत घ्या.)

 

टॅग्स :शेअर बाजारशेअर बाजारइनिशिअल पब्लिक ऑफरिंगव्यवसायगुंतवणूक