Lokmat Money >शेअर बाजार > ९ लाख काेटींनी गुंतवणूकदार श्रीमंत; सेन्सेक्स प्रथमच ६५,००० अंकांवर, आठवड्याची सुरुवात तेजीने

९ लाख काेटींनी गुंतवणूकदार श्रीमंत; सेन्सेक्स प्रथमच ६५,००० अंकांवर, आठवड्याची सुरुवात तेजीने

सेन्सेक्सने महिनाभरात २,३०० अंकांची उसळी घेतली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2023 08:36 AM2023-07-04T08:36:45+5:302023-07-04T08:37:14+5:30

सेन्सेक्सने महिनाभरात २,३०० अंकांची उसळी घेतली आहे.

9 lakh crore investors richer; Sensex crosses 65,000 mark for the first time, starts the week on a bullish note | ९ लाख काेटींनी गुंतवणूकदार श्रीमंत; सेन्सेक्स प्रथमच ६५,००० अंकांवर, आठवड्याची सुरुवात तेजीने

९ लाख काेटींनी गुंतवणूकदार श्रीमंत; सेन्सेक्स प्रथमच ६५,००० अंकांवर, आठवड्याची सुरुवात तेजीने

मुंबई : शेअर बाजारातील तेजी नव्या आठवड्यातही कायम आहे. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजाराने नवा उच्चांक गाठला.  सेन्सेक्सने  ४८६ अंकांची उसळी घेत प्रथमच ६५ हजारांचा टप्पा गाठला. सेन्सेक्स ६५,२०५.०५ अंकांवर तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी १३३.५० अंकांनी वधारून १९,३२२.५५ वर बंद झाला.

सेन्सेक्सने महिनाभरात २,३०० अंकांची उसळी घेतली आहे. तर गेल्या आठवडाभरातच सेन्सेक्स तब्बल २,२३५ अंकांनी वधारला आहे. शेअर बाजारातील तेजी सलग पाचव्या ट्रेडिंग सत्रात कायम राहिली आहे. रविवारी जून महिन्यातील जीएसटी संकलनाचा आकडा जाहीर झाला. जूनमध्येही संकलन दीड लाख काेटी रुपयांपेक्षा जास्त आहे. त्याचाही परिणाम दिसला. 

तेजीचे कारण काय?
शेअर बाजारला उच्चांकी पातळीवर पाेहाेचविण्यामागे दिग्गज कंपन्यांच्या शेअर्समध्ये माेठ्या प्रमाणात झालेली खरेदी आणि परकीय संस्थांनी केलेली माेठ्या प्रमाणात गुंतवणूक, ही दाेन प्रमुख कारणे आहेत. धातू क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअर्समध्येही तेजी आहे. तसेच एचडीएफसी बँक आणि एचडीएफसी यांचे विलीनीकरण झाले. त्यामुळे या शेअर्समध्येही तेजी आली आहे. अमेरिकेतील बाजारातही उत्साहाचे वातावरण आहे. तेथे महागाई कमी हाेत असल्यामुळे फेडरल रिझर्व्हनेही सकारात्मक संकेत दिले आहेत.

Web Title: 9 lakh crore investors richer; Sensex crosses 65,000 mark for the first time, starts the week on a bullish note

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.