Join us

एक मोठी घोषणा अन् शेअरनं घेतला रॉकेट स्पीड, 51 रुपयांच्या शेअरला 20 टक्क्यांचे अपर सर्किट

By ऑनलाइन लोकमत | Published: February 03, 2023 10:36 PM

स्मॉल कॅप कंपनी Naapbooks Limited च्या शेअरलाही 20 टक्क्यांचे अपर सर्किट लागले आहे.

गेल्या काही दिवसांच्या दबावानंतर शुक्रवारी शेअर बाजारात चांगली स्थिती दिसून आली. अशा स्थितीत अनेक लिस्टेड कंपन्यांच्या शेअर्सना अपर सर्किट लागले. स्मॉल कॅप कंपनी Naapbooks Limited च्या शेअरलाही 20 टक्क्यांचे अपर सर्किट लागले आहे. आयटी सेक्टरशी संबंधित या कंपनीने एक मोठी घोषणा केली आहे. या घोषणेनंतर, कंपनीच्या स्टॉकमध्ये जबरदस्त तेजी आली आहे. महत्वाचे म्हणजे, या कंपनीचा आईपीओ 2021 मध्ये आला होता.

का केली घोषणा -Naapbooks लिमिटेडच्या संचालक मंडळाची बैठक होणार आहे. Naapbooks ने बीएसईला दिलेल्या माहितीनुसार ही बैठक 7 फेब्रुवारीला निश्चित करण्यात आली आहे. या बैठकीत फंड जमवण्यासंदर्भात चर्चा होईल. याच बरोबर, राईट इश्यूद्वारे शेअर्स जारी करून निधी उभारण्याचे संकेतही कंपनीने दिले आहेत.

शेअरचा भाव - बीएसई इंडेक्सवर Naapbooks च्या शेअरचा भाव 69.60 रुपयांवर आहे. ट्रेडिंगदरम्यान हा शेअर 51 रुपयांच्या लो  लेव्हलपर्यंत गेला होता. कालच्या तुलनेत या शेअरमध्ये आज 20% ची तेजी दिसून आली. शेअरची 52 आठवड्यांतील उच्चपातळी 90 रुपये आहे. जी सप्टेंबर 2022 मध्ये होती.

शेअरचा परफॉर्मन्स -वेळ                    परतावा1 महिना        39.20 टक्के6 महिना        24.29 टक्के1 वर्ष          20.00 टक्के

टॅग्स :शेअर बाजारशेअर बाजारगुंतवणूक